हिश्श्याच्या खुणा करण्यासाठी लाच घेणारी लिपिक कारागृहात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिश्श्याच्या खुणा करण्यासाठी लाच घेणारी लिपिक कारागृहात

अहमदनगर/प्रतिनिधी : नकाशात खुणा करून देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणार्‍या महिला लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. ज्योती दत

‘शरद पवार ज्येष्ठ पत्रकार आरोग्य संरक्षण योजना’ सुरु करावी
कोतुळेश्‍वर विद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश
महामंडळाच्या थकीत कर्ज व्याजावर ५० टक्के सवलत

अहमदनगर/प्रतिनिधी : नकाशात खुणा करून देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणार्‍या महिला लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. ज्योती दत्तात्रय डफळ उर्फ ज्योती संदिप नराल असे या भूमी अभिलेख कार्यालयातील महिला लिपीकाचे नाव आहे. जुलै 2017 मध्ये नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तिला लाच घेताना पकडण्याची कारवाई केली होती. या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन नगरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी निकाल दिला आहे.
मोजणी केलेल्या गटाच्या नकाशात हिश्श्याची निशाणी करुन देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील ज्योती दत्तात्रय डफळ उर्फ ज्योती संदिप नराल या महिला लिपिकाला चार वर्षे सक्त मजुरी आणि 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली. यातील तक्रारदाराची नगर तालुक्यात साडेतीन हेक्टर जमीन आहे. या जमिनीची आपसात पाच हिश्श्यात वाटणी झाली आहे. या जमिनीची गटफोड झाली नसल्याने तक्रारदाराने भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज देऊन शुल्क भरुन मोजणी करुन घेतली. मोजणीचा नकाशा प्राप्त केला. मात्र, या नकाशात मोजणीप्रमाणे पाच हिश्श्यांची निशाणी (खुणा) नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने मोजणी करणार्‍या लिपीक डफळ यांना हिश्श्याची निशाणी नकाशावर करुन देण्याची विनंती केली. परंतु, नकाशावर निशाणी करुन देण्यासाठी पाच हिश्श्याचे प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे दहा हजार रुपयांची मागणी त्यांनी केली. तक्रारदारांनी या लिपीकाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सापळा रचून डफळ यांना अटक केली. पोलिस निरीक्षक शाम पवरे, विष्णू आव्हाड, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू सावंत, सुनील पवार, एकनाथ आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. याचा तपास पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाम पवरे यांनी केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तेथे सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अर्जुन पवार यांनी बाजू मांडली. साक्षीपुराव्यांसह गुन्हा सिद्ध झाला. त्यानुसार न्यायालयाने डफळ यांना दोषी धरून शिक्षा दिली. लाचप्रकरणी चार वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद, अशी शिक्षा देण्यात आली आहे.

COMMENTS