Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पै. गणेश जगताप याने माऊली जमदाडे याला गदालोट डावावर केले चितपट

पणुंब्रे : कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना तहसिलदार गणेश शिंदे, सपोनि ज्ञानदेव वाघ, हणमंतराव पाटील व मान्यवर.गणेश जगताप विरुध्द माऊली

ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक
पृथ्वी शॉने पुन्हा आपल्या बॅटने दिले सडेतोड उत्तर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 23 धावांनी विजय

आतंरराष्ट्रीय क्रिडा संकुल वस्ताद अर्जुन वीर काकासाहेब पवार यांचा पठ्ठा पै. गणेश जगताप
शिराळा / प्रतिनिधी : जोतिर्लिंग देवाच्या यात्रे निमित्त पणुब्रे वारुण, ता. शिराळा येथे घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकासाठी झालेल्या लढतीत गणेश जगताप याने माऊली जमदाडे यास 34 व्या मिनिटला गदालोट डावावर चितपट करत उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. दुसर्‍या क्रमांकासाठी दोन कुस्त्या पुरस्कृत होत्या. मुन्ना झुंजरके विरुध्द प्रकाश बानकर या अटीतटीच्या लढतीत प्रकाश बानकर याने मुन्ना झुंझरके यास लाटणे डावाने चितपट केले. माऊली कोकाटे विरुध्द पृथ्वीराज पाटील यांच्यात झालेल्या कुस्तीत पृथ्वीराज पाटील याने पहिला गुण घेतल्याने त्यास विजयी घोषित करण्यात आले. तीन नंबरच्या कुस्तीत संतोष जगताप विरुध्द विक्रम शेटे या लढतीत संतोष जगताप यास विजयी घोषित करण्यात आले. चार नंबर साठीच्या कुस्तीत अमर पाटील याने सिताराम धायुगडे याच्यावर विजय मिळवला. पाच नंबरच्या लढतीत स्थानिक मल्ल बाबू ढेरे याने सचिन पाटील यास नाकपट्टी डावावर चितपट करत विजय मिळवला. सहा नंबरसाठी खेळवण्यात आलेल्या कुस्तीत निलेश पाटील याने ओंकार नलवडे वर एकचाक डावाने मात केली. प्रारंभी कुस्ती आखाड्याचे पूजन माजी सभापती हणमंत पाटील चर्मकार संघटना महाराष्ट्र राज्य सहसचिव संभाजी कांबळे, यशवंत ढेरे, मारुती पाटील, नंदकुमार काळे या प्रमुखासह यात्रा कमेटी पदाधिकारी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानातील इतर विजयी मल्ल असे भैरव माने, अक्षय शिंदे, सुरज मुंडे, दत्ता बानकर, मयूर जाधव, कर्तार कांबळे, प्रवीण पाटील, प्रथमेश गुरव, विशाल बिरंजे, सुशांत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अथर्व पाटील. मैदानात पंच म्हणून पांडुरंग ढेरे, मोहन पाटील, वसंत पाटील, आनंदा इंगळे यांनी काम पाहिले. मैदानास शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, सपोनि ज्ञानदेव वाघ, कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. आर. जाधव, ऑलंम्पिक वीर बंडा पाटील रेठरेकर, उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, सरपंच राकेश सुतार, संभाजी मस्कर, माजी डेपोटी अंकुश पाटील, संपत काळे, शिव प्रतिष्ठान अध्यक्ष शिवाजी पाटील, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, माजी जि. प. सदस्य रणधीर नाईक, रत्नागिरी जि. प. चे माजी सभापती शरद चव्हाण, उद्योजक बळीराम पाटील, टी. बी. पाटील, आनंदा पाटील, ठाणे स्थाही समिती सदस्य तानाजी पाटील, उपसरपंच सर्जेराव पाटील, उपमहाराष्ट्र केसरी शिवाजी लाड, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष काकासाहेब आमणे, सरपंच विजय पाटील, वाय. सी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कुस्ती मैदानाचे संपुर्ण सुंदर समालोचन निवेदक सुरेश जाधव चिंचोली आणि ईश्‍वरा पाटील यांनी केले.

COMMENTS