अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील विविध अस्थापनांमधील कागदपत्रांच्या रद्दीच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपये पोलिस
अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील विविध अस्थापनांमधील कागदपत्रांच्या रद्दीच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपये पोलिस खात्याला मिळाले. पोलिस अधीक्षक कार्यालयामधील विविध आस्थापनांमध्ये अनेक वर्षांची कागदपत्रे पडून होती. या कागद आणि फायलींमुळे जागाही अडवून पडली जात होती. त्यामुळे या सर्व कागदपत्रांची छाननी करून जी कागदपत्रे लागत नाही, अशा कागदपत्रांचे गठ्ठे रद्दीमध्ये काढण्यात आले आहेत. 1997 पासूनच्या कागदपत्रांची छाननी करून ही रद्दी काढण्यात आली व निविदा काढून विकण्यात आली आहे. सर्वात जास्त रक्कम असलेली निविदा एक लाखांच्यापुढे असून यामुळे पोलिस खात्याला मोठा फायदा झाला आहे. ही कागदपत्रे आता पोलिसांच्या उपस्थितीमध्ये रिसायकलिंग केली जाणार आहेत. यापूर्वी अशी सरकारी न लागणारी कागदपत्रे जाळण्यात येत होती. मात्र पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेमुळे आता ही कागदपत्रे न जाळता रिसायकलिंगसाठी देऊन पर्यावरणाच्या रक्षणाचा हेतूही साध्य केला जात आहे.
COMMENTS