Homeताज्या बातम्या

सातार्‍यात वाहन दंड कमी करण्यासाठी आंदोलन

सातारा / प्रतिनिधी : वाहनांवरील कारवाईदरम्यान आकारण्यात येणारा दंड कमी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र कामगार, कर

Nashik : नाशिक पेठ मार्गावर लाखो रूपयाचा बेकायदा गुटखा जप्त
आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञान काळाची गरज ः माजी लोकायुक्त टहलियानी
अंगावर काटा आणणारा व्हिडिओ होतोय व्हायरल! | LOKNews24

सातारा / प्रतिनिधी : वाहनांवरील कारवाईदरम्यान आकारण्यात येणारा दंड कमी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र कामगार, कर्मचारी संघाच्या वतीने शहरातील रिक्षाचालकांनी आंदोलन केले.
याबाबतचे निवेदन आंदोलक रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. राज्य शासनाने वाहतूक नियम मोडणार्‍यांवर केलेल्या कारवाईदरम्यान आकारण्यात येणार्‍या दंडामध्ये प्रचंड वाढ केली आहे. ही वाढ सर्वसामान्य जनतेची तसेच प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांचे कंबरडे मोडणारी आहे. कोरोना काळात अनेकांच्या हाताचे रोजगार हिरावले गेले असून, त्यांना दररोज हातातोंडाची गाठ घालताना कसरत करावी लागत आहे.
सद्य:स्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून, त्याला तोंड देत सर्वसामान्य प्रवाशांची ने-आण करण्याचे काम खासगी वाहतूकदार, रिक्षाचालक करत आहेत. या वाहनांवरील दंडातही प्रचंड वाढ केली असून, एखाद्यावेळी झालेल्या कारवाईदरम्यान त्यास इतका दंड भरणे शक्य होणार नाही. शासनाने सर्वसामान्यांचा विचार सहानुभूतीपूर्वक करत केलेली दंड वाढ मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर चंद्रकांत खंडाईत, बाळकृष्ण देसाई, शशिकांत खरात व इतर रिक्षा व्यावसायिकांच्या सह्या आहेत.

COMMENTS