नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात अहमद

कान्होळा नदी परिसरातील जलपर्णी हटवली
डॉक्टर म्हणून आला आणि पैशांचा गंडा घालून गेला
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवळ्या चोरी

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आज यश आले. प्रस्तूत बातमीची हकिगत अशी कि , दिनांक ०५/१२/२०२१ रोजी फिर्यादी श्री . बबन जगन्नाथ बेल्हेकर वय ६५ , रा . कांगोणी , ता . नेवासा हे त्यांचे कुटूबियासह घरामध्ये झोपलेले असतांना कोणीतरी अ त गुन्हेगारांनी त्याचे घराचे मागिल बाजुचा सेफ्टी डोअर व लाकडी दरवाजा तोडुन , घरामध्ये प्रवेश करुन , फिर्यादी व त्यांचे आईस चॉपर व चाकुचा धाक दाखवुन गळ्यातील मंगळसूत्र तसेच कपाटातील रोख रक्कम असा एकुण ३,३६,००० / – रु . किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला होता.

सदर घटने बाबत फिर्यादी यांनी शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. १४०/२०२१ भादविक ३ ९ ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरची घटना घडल्यानंतर तसेच यापुर्वीही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असल्याने  अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील  यांनी सदरचा गुन्हा घडले ठिकाणी भेट देवुन घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन सदर गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या . त्याप्रमाणे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या . त्या प्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १ ) रविंद्र भोसले रा . गंगापुर जिल्हा औरंगाबाद याने व त्यांचे साथीदारांनी मिळुन केल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे , सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे , पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल चव्हाण , दत्ता हिंगडे , मनोहर गोसावी , संदीप पवार , दत्ता गव्हाणे , पोलीस नाईक शंकर चौधरी , ज्ञानेश्वर शिंदे , संदीप दरदंले , पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र घुगांसे , आकाश काळे , सागर ससाणे ,कमलेश पाथरूड , रोहित येमुल व चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन बेरड अशांनी मिळून गंगापुर येथे जावुन आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे १ ) रविंद्र मुबारक भोसले रा . गंगापुर , जिल्हा औरंगाबाद यास गंगापुर येथुन ताब्यात घेतले त्याचेकडे नमुद गुन्ह्या बाबत चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार लखन चव्हाण , कुलथ्या भोसले व इतर साथीदारांनी मिळुन केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीच्या आधारे आरोपींताचा शोध घेवुन आरोपी नामे २ ) नंबर ऊर्फ लखन प्रल्हाद चव्हाण रा . अंतापुर , ता . गंगापुर , जिल्हा औरंगाबाद , ३ ) कुलत्या बंडु भोसले रा . बाबरगांव , ता . गंगापुर , जिल्हा औरंगाबाद यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन     ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या आरोपींताकडे वरील नमुद गुन्हया व्यतीरिक्त आणखीन कोटेकोठे गुन्हे केले आहेत . या बाबत कसून चौकशी केली असता त्यांनी मागिल १५ दिवसांचे कालावधीमध्ये राहुरी , नेवासा व पाथर्डी तालुक्यातील शेतातील वस्त्यावर जावुन मारहाण करुन लुटमार केली असल्य सांगितल्याने त्यांना ताब्यात घेवुन शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन करीता आहे.
*सदर माहितीवरुन संबंधीत पोलीस स्टेशनचे दाखल गुन्ह्यांचे अभिलेख तपासुन खात्री केली असता वरील नमुद आरोपींकडुन खालील प्रमाणे एकुण ०५ गुन्हे उघडकिस आलेले आहेत . ९९ २ / २०२१ भादविक ३ ९ ४ , ३४ १. राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २. राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३. नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४. पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५. शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन ९९ ४ / २०२१ भादविक ३ ९ २ , ३४ सह आर्म अॅक्ट ४/२५ ९ ३३ / २०२१ भादविक ३ ९ ४ , ४५७ , ३८० ९ ५३ / २०२१ भादविक ३ ९ ४ , ३ ९ ७ , ३४ गु.र.नं. १४०/२०२१ भादविक ३ ९ ५* 
*आरोपी नामे कुलत्या बंडु भोसले रा . बाबरगांव , ता . गंगापुर , जिल्हा औरंगाबाद यांचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे दरोड्याचे एकुण ०६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे . १. पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४१/२०२० भादविक ३ ९ ५ , ३ ९ ७ २. वांळुज , जिल्हा औरंगाबाद पोलीस स्टेशन गु.र.नं. ३. वांळुज , जिल्हा औरंगाबाद पोलीस स्टेशन गु.र.नं. ४. वांळुज , जिल्हा औरंगाबाद पोलीस स्टेशन गु.र.नं. ५. वांळुज , जिल्हा औरंगाबाद पोलीस स्टेशन गु.र.नं. ६. वांळुज , जिल्हा औरंगाबाद पोलीस स्टेशन गु.र.नं. २ ९ ६ / २०१ ९ भादविक ३ ९ ५ ४ ९ / २०२० भादविक ३ ९ ५ २ ९ ३ / २०१ ९ भादविक ३ ९ ५ ४३ / २०२० भादविक ३ ९ ५ ८८/२०२० भादविक ३ ९ ५*
 सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील ,पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्रीमती . दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर व श्री . सुदर्शन मुंढे  , उपविभागीय पोलीस अधीकारी , शेवगांव विभाग  सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

COMMENTS