कोरोनाच्या संकटात नागरिकांना शहरातील अद्ययावत रुग्णालये देतील दिलासा : दादाजी भुसे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या संकटात नागरिकांना शहरातील अद्ययावत रुग्णालये देतील दिलासा : दादाजी भुसे

मालेगाव : दोन वर्षात कोरोना सारख्या महामारीचा आपण सर्वांनी मिळून चांगल्या प्रकारे सामना केला आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद तसेच आरोग्य विभागासह

पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव द्या
दैव बलवत्तर म्हणून बिबट्यापासून वाचला जीव
केंद्र व राज्य सरकारचे पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पुरस्कृत करण्याचा वर्ल्ड पार्लमेंटचा मानस

मालेगाव : दोन वर्षात कोरोना सारख्या महामारीचा आपण सर्वांनी मिळून चांगल्या प्रकारे सामना केला आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद तसेच आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासन व कोरोना योद्धांची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. केंद्र व राज्य शासनासह सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून शहरात साकारण्यात येणाऱ्या अद्यावत रुग्णालयांमुळे कोरोनाच्या संकटात येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.

मालेगाव शहर व ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात तीन अद्यावत रुग्णालयांच्या भूमीपूजन कार्यक्रमात कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे बोलत होते. याप्रसंगी महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, गटनेते मनोहर बच्छाव, महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे, संजय दुसाणे, रामा मिस्तरी, श्रीमती अनिता भुसे, श्रीमती महाले, लिलाबाई मसदे, चित्रा सोनवणे, नगरसेवक नारायण शिंदे, अनिल भुसे, भैय्या देशमुख, तानाजी देशमुख यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येणाऱ्या काळात कोरोनाचे समुळ उच्चाटन होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मालेगाव शहरात एकूण पाच रुग्णालयांची निर्मिती होणार असल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, यापैकी आज तीन रुग्णालयांचे भूमिपूजन करण्यात येत आहे. संपूर्ण देशावर ओमायक्रॉन या कोविडच्या नवीन विषाणूचे संकट घोंगावत आहे. या विषाणूचा संसर्ग पसरु नये म्हणून शासनाने अधोरेखित केलेल्या नियमांचे व त्रिसूत्रीचे पालन सर्व नागरिकांनी कटाक्षाने करण्याबरोबर आपल्यासह इतरांचीही सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले. शहारात तीनही रुग्णालयांचे भूमीपूजन करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, यामध्ये अल्पसंख्याक कल्याण निधी अंतर्गत रुग्णालय द्याने-रमजानपुरा येथे 15 खाटांचे अद्ययावत रुग्णालय 4 कोटी 15 लाखाचे असून यामध्ये केंद्र सरकाचा हिस्सा 2.49 तर राज्य सरकारचा हिस्सा 1.66 तसेच मालेगाव कॅम्प येथे 100 खाटांचे रुग्णालय 4 कोटी 50 लाख खर्चाचे असून अमेरिकन इंडिया फाऊंडेशन ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून हे रुग्णालय साकारण्यात येणार आहे. तर मालेगावतील मोसम पुलाजवळ राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत अद्यावत असे 100 खाटांचे महिला व बाल रुग्णालयास 33 कोटी 77 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली. संपूर्ण महाराष्ट्रात एकुण 12 रुग्णालयांना मंजुरी मिळाली असतांना राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत महिला व बाल रुग्णालयाच्या बांधकामाची सुरुवात मालेगावातून होत असल्याने मंत्री श्री.भुसे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत. शहरात साकारण्यात येणाऱ्या नवीन रुग्णालयांच्या इमारतींकरिता जागा उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक नागरिकांसह महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, शहरात साकारण्यात येणाऱ्या सर्व रुग्णालयात संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य प्रशासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS