पुणे : राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे शाळा सुरू करण्याविषयी संभ्रमावस्था आहे. राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय एवढे दिवस जिल्हाधिकारी आ
पुणे : राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे शाळा सुरू करण्याविषयी संभ्रमावस्था आहे. राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय एवढे दिवस जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर सोपवण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील काही शहरांच्या शाळा सुरु तर काही ठिकाणच्या बंद आहेत. त्यामुळे राज्यभरात विविध पातळ्यांवर मतभेद दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य करतांना म्हटले आहे की, 15 डिसेंबर रोजी होणार्या कॅबिनेटच्या बैठकीत, शाळा सुरू करायच्या की नाही, यावर निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भातला अंतिम निर्णय बुधवारी कॅबिनेट बैठकीत घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील यंत्रणांनाही कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत स्थानिक प्रशासनात मतभेद होण्यापेक्षा राज्य स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल. हा एकत्रित निर्णय राज्यातील सर्वच शाळांसाठी लागू असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले. नाशिक शहरातील महापालिकेच्या हद्दीतील शाळा 13 डिसेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं नुकताच घेतला आहे. तर औरंगबाद महापालिकेने 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहिल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल असे सांगितले. मुंबई आणि पुणे-पिंपरी-चिंचवड येथील शाळादेखील 15 डिसेंबर नंतर सुरु कऱण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. आता बुधवारी राज्य पातळीवर सरकार काय निर्णय घेईल, याकडे विविध शहरांतील स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे. औरंगाबादमध्ये जिल्हाधिकार्यांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष करणार्या नागरिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 15 डिसेंबर पासून दुसर्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लस घेतली नसल्याचे आढळल्यास त्यांना 15 दिवसाला 500 रुपये या प्रमाणे दंड आकारला जाईल, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, औरंगाबाद लसीकरणात मागे असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. लोक इतरांना अजिबातच विचार करत नाही. राज्य पातळीवरही लसीकरणाचा वेग कमी झाल्यास असा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो.
COMMENTS