संगमनेरातील प्रसिद्ध नसीब वडापाव दुकान प्रशासनाकडून सील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरातील प्रसिद्ध नसीब वडापाव दुकान प्रशासनाकडून सील

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील प्रसिद्ध नसीब वडापाव सेंटरला प्रशासनाने काल सोमवार दि.५ रोजी पुढील सात दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.

जवळके शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुड भरारी !
संगमनेरात पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर
…तर, आमदारांच्या निवासासमोरच राहुटी टाकणार

संगमनेर/प्रतिनिधी :  

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील प्रसिद्ध नसीब वडापाव सेंटरला प्रशासनाने काल सोमवार दि.५ रोजी पुढील सात दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करता, सामाजिक अंतर न राखता, सॅनिटायझर आणि मास्क चा वापर न करता सुमारे पन्नास लोकांनी वडापाव खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केल्यामुळे प्रशासनाला हि कारवाई कारवाई करावी लागली आहे. तालुक्याचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या कोरोना विरोधी पथकाने सदरील कारवाई केली आहे. समनापूर येथील नसीब वडापाव सेंटर तालुक्यासह जिल्ह्यात आपल्या चवदार वडापाव साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तालुक्यातील खवय्ये याठिकाणी नेहमीच गर्दी करत असतात, याशिवाय कोल्हार घोटी राज्य महामार्गावरून प्रवास करणारे बाहेरगावचे नागरिकही याठिकाणी थांबून आवर्जून येथील वडापावचा आस्वाद घेत असतात. त्यामुळे वडापाव सेंटरवर प्रशासनाकडून झालेली कारवाई दुर्दैवी असली तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन  करून व्यवसाय करावा असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.

COMMENTS