अहमदनगर/प्रतिनिधी ः पुणे येथील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्यावतीने दिला जाणारा अशोक भूषण पुरस्कार नगर मनपाचे अभियंता परिमल निकम यांना जाहीर झाला आह
अहमदनगर/प्रतिनिधी ः पुणे येथील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्यावतीने दिला जाणारा अशोक भूषण पुरस्कार नगर मनपाचे अभियंता परिमल निकम यांना जाहीर झाला आहे. सोमवारी (6 डिसेंबर) महापरिनिर्वाणदिनी रेणापूर तालुक्यातील (जि. लातूर) पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यस्मारकात होणार्या कार्यक्रमात आग्रा (उत्तर प्रदेश) येथील सहाव्या धम्मसंंगितीचे अध्यक्ष आचार्य प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष (स्व.) डॉ. अशोक शिलवंत यांनी सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या 14 शीलालेखांवरून प्रेरीत होऊन, ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य वा त्यांच्याशी संबंधित काही ऐतिहासिक घटना आहेत, अशा 14 ठिकाणी अशोक स्तंभ उभा करण्याचा संकल्प केला होता. त्यातील नववा अशोक स्तंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यस्मारक यांच्या मदतीने पानगावला (रेणापूर,लातूर) उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण सोमवारी (6 डिसेंबर) दुपारी साडेबारा वाजता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे व लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रा. सोनग्रा यांच्या हस्ते मंत्री मुंडे यांना अशोकरत्न तसेच मंत्री देशमुख व बनसोडे यांना अशोक विभूषण आणि नगर मनपाचे अभियंता निकम यांना अशोक भूषण पुरस्काराचे वितरण होणार आहे. याशिवाय अन्य 14 पुरस्कारांचेही वितरण यावेळी होणार आहे.
COMMENTS