अहमदनगर/प्रतिनिधी : स्नॅप चॅट अॅपवर ओळख करून अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न करून तिचा विनयभंग करणार्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी तीन तासात बेड्या ठो
अहमदनगर/प्रतिनिधी : स्नॅप चॅट अॅपवर ओळख करून अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न करून तिचा विनयभंग करणार्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी तीन तासात बेड्या ठोकल्या.
संबंधित अल्पवयीन मुलगी ही गॅलरीमध्ये उभी असताना तेथे आरोपी गिरीश सुनील वरकड (रा. बुरुडगाव रोड, नक्षत्र लॉन, अहमदनगर) हा आला व त्याने मुलीला हातवारे करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व त्यानंतर ती क्लासला जाता असताना तिचा पाठलाग करत होता. कुटुंबाला जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील त्याने स्नॅप चॅट अॅपवर ओळख करून मोबाईलच्या माध्यमातून वेळोवेळी फोन करून, मिस कॉल करून, मेसेज करून, मुलीचा छुपा पाठलाग करुन, हातवारे करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना माहिती मिळाली की आरोपी आरोपी गिरीश वरकड हा दिल्ली गेट परिसरामध्ये मिळेल. त्यामुळे तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्ग, पोलीस कर्मचारी सुजय हिवाळे, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, योगेश कवाष्टे, तानाजी पवार,अमोल गाडे, सोमनाथ राऊत, प्रमोद लहारे आदीच्या पथकाने आरोपीला गुन्हा दाखल होताच तीन तासात अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
—
COMMENTS