जावेद अख्तर यांचा ब्राह्मणी धिंगाणा !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

जावेद अख्तर यांचा ब्राह्मणी धिंगाणा !

सरकारच्या आर्थिक माधुकरीवर वर्षोनुवर्षे चालणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ९४ वा भाग आता सध्या नाशिक येथे सुरु आहे. कवी संमेलनात ब्राह्मणेतर

भाजपच्या माजी मंत्र्यांच्या मेव्हण्याचा प्रताप ; बनावट दाखल्याआधारे मुलाचा शाळा प्रवेश
पवार कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर
पवारांचे तळ्यात – मळ्यात का ?

सरकारच्या आर्थिक माधुकरीवर वर्षोनुवर्षे चालणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ९४ वा भाग आता सध्या नाशिक येथे सुरु आहे. कवी संमेलनात ब्राह्मणेतर कवींना निमंत्रित न केल्याच्या मुद्यावरून सालाबादप्रमाणे टीकेच्या वादळात सापडलेल्या या संमेलनाला उत्तम कोळगावकर सारख्या आकाशवाणी सारख्या सरकारी व्यवस्थेतून पोसल्या गेलेल्या तथाकथित बहुजन कवीने सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अर्थात, अशा भटाळलेल्या साहित्यिकांची संख्याही लक्षणीय असते. परंतु, त्यात स्वतंत्र प्रतिभेची वानवाही तितकीच असते. कोळगावकर आकाशवाणी सारख्या क्षेत्रात कार्यरत होते, त्यामुळे त्यांचा उपयोग करून आकाशवाणी चे मानधन फस्त करणारे अनेक ब्राह्मणी साहित्यिकांना त्यांचा सेवा-मेवा चांगलाच लाभला असणार! पण आपल्य दखलचा चर्चेचा मुख्य मुद्दा हा नाही. तर, ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठसकेबाज भाषण करणारे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांचे भाषण हा आज चर्चेचा मुद्दा आहे. अख्तर हे उर्दू शायर देखील आहेत. उत्तर भारतीय असणारे अख्तर यांचा वावर माध्यमातूनही सर्वत्र असतो. लोकशाही व्यवस्थेला सशक्त ठेवण्यासाठी तटस्थ वक्तव्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांची गरज असते, हे त्यांनी ठासून सांगितले. परंतु, त्यांच्या संपूर्ण भाषणात ते ब्राह्मणी व्यवस्थेचेच कसे हस्तक आहेत, याची झलक दिसली. मुळातच, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आता ब्राह्मणेतर साहित्यिकांनी बहिष्कार टाकला आहे. अशा वेळी जावेद अख्तर सारखे लोकप्रिय माध्यमातून वावरणाऱ्या साहित्यिकांना आपण पुरोगामी समजत असताना त्यांच्यासारखा प्रतिभेचा साहित्यिक ब्राह्मणी संस्कृतीचा उदोउदो करित असेल तर ते निश्चितच धिक्कारार्ह आहे. मराठी साहित्य आणि साहित्यिक यांची चर्चा करता-करता ते थेट तुलसीदास च्या गुणगान करण्यापर्यंत मजल मारतात. ते एवढ्यावरच थांबत नाही; तर तुलसीदास त्याकाळात संस्कृत ग्रामीण भागात पोहचविणे अवघड होते, अशा काळात ते उत्तर भारताच्या ग्रामीण भागात संस्कृत साहित्य प्रसवून प्रचारित करित होते, असे म्हणतात. वास्तविक, जावेद अख्तर यांच्यासारखा स्वतंत्र प्रतिभेचा साहित्यिक भारतीय साहित्याचा अभ्यास करताना त्याच्या सामाजिक अंगाचेही अभ्यासक असतील, अशी आमची आजपर्यंत धारणा होती. परंतु, ” ढोल, पशू, गवार नारी सब ताडन के अधिकारी”, असं साहित्य प्रसवणाऱ्या तुलसीदासाची कोणती महनियता त्यांच्या साहित्यात अख्तर यांना दिसली ते जरा त्यांनी स्पष्ट करावं. आम्ही हे जाणून आहोत की, मुस्लिम समाज हा प्रामुख्याने शहरी समाज आहे; त्या समाजाला भारताच्या ग्रामीण समाजव्यवस्थेत असणाऱ्या जातींचे चटके सोसावे लागले नाहीत. मात्र, याचा अर्थ खचितच असा नव्हे की, त्यांनी या देशातील समाजव्यवस्था अभ्यासू नये! अख्तर यांच्यासारखा प्रतिभावान साहित्यिकाने जर भारतीय समाजरचना आणि व्यवस्थेला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, तर, आम्ही खात्रीने सांगतो की, ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर गेलेच नसते. त्यांना साहित्य मंचावर निमंत्रित करून प्रस्थापित सारस्वतांनी त्यांच्या संकुचित भुमिकेचा उदोउदो करून घेतला. यासाठी अख्तर यांचा त्यांनी बेमालूमपणे उपयोग करून घेतला. अशावेळी आमच्या समोर एक प्रश्न असा उभा राहतो की, अख्तर सारखे प्रतिभावान साहित्यिक आपला उपयोग जर इतक्या सहजपणे करू देत असतील तर त्यांच्याविषयी आमच्या मनात त्यांची विचारवंत म्हणून असणारी प्रतिमा चूक आहे का? हा प्रश्न आम्हाला सतावू लागला आहे! अख्तर यांनी वेळ मिळेल तेव्हा आमच्या या शंका वजा प्रश्नाचे निरसन करावे!

COMMENTS