मुंबई : गेल्या काही महिन्यापासून अज्ञातवासात असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अचानक मुंबईत परतले असून, चौकशी समितीला सामौरे गेले असले तरी
मुंबई : गेल्या काही महिन्यापासून अज्ञातवासात असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अचानक मुंबईत परतले असून, चौकशी समितीला सामौरे गेले असले तरी, त्यांच्या अडचणी थांबलेल्या नाही. गुरूवारी राज्य सरकारने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला होता. परमबीर सिंह यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांना होमगार्डच्या महासंचालकपदी नेमण्यात आले होते. मात्र त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचा आरोप करून खळबळ उडवून दिली. हा आरोप करून ते कोणतीही पूर्वसूचना न देता तब्बल 234 दिवस फरार झाले. न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते मुंबईत प्रकट झाले. परमबीर सिंग यांच्यावर बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता या कारणावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयातून परतताच पहिल्याच दिवशी आज फाईलवर स्वाक्षरी करून परमबीर सिंग यांना तगडा हादरा दिला आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल्स, बार, ऑर्केस्ट्रा चालकांकडून पोलिसांना 100 कोटीं रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करुन परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या आरोपांवरुन राज्य शासनाने चांदिवाल आयोग स्थापन केला आहे.
COMMENTS