कराड / प्रतिनिधी : कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे काल बुधवारपासून कराड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका चंद्रमौळी झोपडीत
कराड / प्रतिनिधी : कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे काल बुधवारपासून कराड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका चंद्रमौळी झोपडीत राहणार्या ऊसतोड मजुरांना बसलाय. रात्रभर पडणार्या पावसात त्यांच्या झोपड्यात पाण्यात गेल्याने त्यांचे अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. त्यांना सध्या निवार्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.
साखर कारखान्यांचा हंगाम सध्या सुरू आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आदीसह कर्नाटकातून ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यांच्यामार्फत सध्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. कालपासून वातावरणातील बदलामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले आहे.
पावसाने रात्रभर जोरदार बरसात केल्यामुळे माळरानावर उघड्या ठिकाणी वास्तव्य असणार्या ऊसतोड मजुरांना त्याचा मोठा फटका बसलाय. रेठरे, शिरवडे, उंडाळे, काले, तांबवे, शेणोली, उंब्रज, पाल आदी परिसरातील ऊसतोड मजुरांच्या झोपड्या पावसाच्या पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे भिजून मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्या निवार्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाले. त्यांच्यापुढे सध्या संबंधित नुकसान भरून काढण्याचं मोठे आव्हान उभे राहिले आहे.
COMMENTS