कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

Homeताज्या बातम्याअहमदनगर

कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

अहमदनगर/प्रतिनिधी ः आई व भावडांना जीवे धमकी देऊन महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात साजिद अब्दुल लतीफ शेख उर्फ लाला

जयंतरावांचे कुटील कारस्थान उध्वस्त करणार : निशिकांत पाटील
प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी एमपीएससीकडून अधिसूचना
फलटण नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी ः आई व भावडांना जीवे धमकी देऊन महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात साजिद अब्दुल लतीफ शेख उर्फ लाला (रा. बोल्हेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडितेच्या पतीचे आजारपणामुळे निधन झाले आहे. आरोपीचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याने त्यास पीडिता ओळखते. पीडिता ही तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी गेली असताना आरोपी साजिद तेथे आला व सोबत राहायला चल व लग्न कर असे तो म्हणाला. पीडितेने त्यास नकार दिला. त्याने पीडितेच्या आईला, भावाला व मुलांना मारून टाकण्याची धमकी देऊन पीडितेला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे पीडितेच्या मुलीस मारून टाकण्याची धमकी देऊन पीडितेवर वारंवार अत्याचार केला. घराबाहेर जाताना तो पीडितेला व तिच्या मुलीला घरात ठेवून घराला बाहेरून कडी लावून जात होता, पीडितेला घरी आणून सोडण्यास तिच्या भावाने नकार दिल्याने त्याने भावाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS