Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्रिशंकू भागातील पथदिवे बंद ठेवून विज बचतीचा सातारा नगरपरिषदेकडून संदेश

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरात हद्दवाढीनंतर समाविष्ट झालेल्या भागातील पुन्हा पथदिवे बंद करून सातारा नगरपरिषदेने बचतीचा नवा फंडा सुरु केला आहे.

राजे प्रतिष्ठानची लवकरच नवी कार्यकारिणी : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले
वनश्री महाडीक मल्टीस्टेट सोसायटीला 56 लाखांचा नफा : राहुल महाडीक
एसटीच्या संपामुळे टीईटी परीक्षेस 1634 गैरहजर

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरात हद्दवाढीनंतर समाविष्ट झालेल्या भागातील पुन्हा पथदिवे बंद करून सातारा नगरपरिषदेने बचतीचा नवा फंडा सुरु केला आहे. मात्र, दुसरीकडे अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्याच्या रस्त्यांचे पथदिवे पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्यात आले आहेत. पर्यटकांची गैरसोय नको, करदात्यांच्या घरावर नांगर फिरो अशी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या दोन दिवस बंद असलेले पथदिवे एक दिवस सुुरु करून पुन्हा बंद ठेवण्यात आले आहेत.
गेल्या दोन दिवसापासून बंद असलेले पथदिवे एक दिवसासाठी सुरु करून सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीनंतर समावेश झालेल्या त्रिशंकू भागातील पथदिवे पुन्हा मंगळवारी रात्री बंद ठेवण्याचे कारस्थान नगरपरिषदेच्यावतीने सुरु केले आहे. आता नगरपरिषद नको असे म्हणण्याची वेळी त्रिशंकू भागातील लोकांवर आली आहे. पूर्वी या परिसरात गृहनिर्माण संस्था स्वनिधीतून पथदिवे बसविणे, त्याची दुरुस्ती करणे तसेच त्याचे विजबिल भरत असत. आता हेच सर्व पथदिवे नगरपरिषदेच्या फिडरला जोडले आहेत. त्यावेळपासून त्रिशंकू भागातील पथदिव्याच्या खेळखंडोबा सुरु झाला आहे. रात्रीच्या वेळी अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणार्‍या मार्गावरील पथदिवे आजही सुरु आहेत. मात्र, नागरी वस्तीतील पथदिवे बंद पाडून नगरपरिषदेतील अधिकारी-पदाधिकारी मंडळी काय साध्य करत आहेत, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. यावर नगरपरिषदेच्या प्रशासनाने विचार करावा, अन्यथा येणार्‍या निवडणूकीत आताचे सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्षातील असो, सर्वांना मते देण्यापेक्षा शिव्याशाप देण्यास सुरुवात करतील. तसेच नगरपरिषदेची कर आकारणीच्या मोजणीदरम्यान या भागातील लोकांनी का सहकार्य करावे, असा सवाल उपस्थित होत आहे.

COMMENTS