Homeकृषी

कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी

तासगाव / प्रतिनिधी : तासगाव तालुक्यात आतापर्यंत शांततेत सुरु असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनास सोमवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. विटा आगारा

माण-खटावची इंच न इंच जमीन ओलीताखाली आणणार : आ. जयकुमार गोरे
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रा
बारावीतील विद्यार्थ्याची वाघोली येथे आत्महत्या

तासगाव / प्रतिनिधी : तासगाव तालुक्यात आतापर्यंत शांततेत सुरु असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनास सोमवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. विटा आगाराच्या विटा-सांगली बसवर सोमवारी सायंकाळी कवठेएकंद गावाच्या हद्दीत अज्ञातांनी दगडफेक केली आहे. यामध्ये बसचा चालक किरकोळ जखमी झाला.
तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन प्रवाशांची सोय करण्यासाठी काही मार्गावर बससेवा सुरु केली आहे. यामुळे सेनेच्या पदाधिकार्‍यांवर एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांचा रोष आहे. सरकार एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करत कर्मचारी आक्रमक बनले आहेत.
सोमवारी सायंकाळी विटा आगाराची विटा-सांगली ही बस पोलीस बंदोबस्तात संगलीकडे निघाली होती. या बसवर कवठेएकंदजवळ अज्ञातांनी दगडफेक केली. बसची पुढील बाजूची व खिडकीची काच फुटली आहे. या दगडफेकीत बसचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यात एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले आहे.

COMMENTS