सातारा / प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात जावळी तालुक्यात संघात राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे, क
सातारा / प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात जावळी तालुक्यात संघात राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे, कोरेेगाव तालुक्यात शिवाजीराव महाडिक, खटाव तालुक्यात नंदकुमार मोरे तर माण मतदार संघात मनोज पोळ व कराड तालुक्यात काँग्रेसचे उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना पराभवास सामोरे जावे लागले. निवडूण आलेले उमेदवार ज्ञानदेव रांजणे (अपक्ष), सुनील खत्री (मुळचे राष्ट्रवादीचे मात्र, सध्या शिवसेनेकडून), शेखर गोरे (कधी रासप तर कधी राष्ट्रवादी मात्र, सध्या शिवसेनेकडून) माजी आमदार प्रभाकर घार्गे (मुळचे राष्ट्रवादीचेच मात्र सध्या बंडखोरी), सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादीचे) व सत्यजित पाटणकर (राष्ट्रवादीचे) निवडूण आले आहेत. या निवडणूकीत काँग्रेसला भोपळा मिळाला तर राष्ट्रवादीला दोन जागेवर समाधान मिळाले. शिवसेनेने दोन जागा मिळवल्या मात्र, ते उमेदवार मुळेचे राष्ट्रवादीचेच असल्याने राष्ट्रवादीचा वरचष्मा बँकेवर राहणार हे निश्चित या पाच जागांकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण सहकार क्षेत्रातील तज्ञांचे लक्ष लागले होते. दरम्यान, निकाल जाहीर होताच आ. शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सातारा येथील कार्यालयावर दगडफेक केली. या घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील वातावरण ताणावाचे बनले होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा नवखे उमेदवार महेश शिंदे यांनी पराभव केला होता. तसेच निकाल आज जाहीर झालेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पहायला मिळाले. त्यांच्या पहिल्या मतदार संघात भाजपचे आमदार व बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जवळचे कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. त्यात रांजने यांनी आ. शशिकांत शिंदे यांना एका मताने पराभव केला. ज्या कोरेगाव-खटाव-सातारा विधानसभा मतदार संघात आ. शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धुरळा पाहण्याची वेळ आली. त्याच मतदार संघात शिवाजीराव महाडिक व सुनिल खत्री यांना समान मते पडली. मात्र, ऐनवेळी घेतलेल्या चिट्टीच्या कौलामध्ये आ. महेश शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते सुनील खत्री विजयी झाले. दोन्ही मतदार संघातील निवडणूक आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मतदानाच्या दिवशी जावळी तालुक्यात आ. शशिकांत शिंदे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या गटामध्ये झालेली धुमश्चक्रीचा दुष्परिणाम तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
इकडे खटाव तालुक्यात सहकार पॅनेलचे नंदकुमार मोरे यांना माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी चांगलाचा धुरळा चारला. माण मतदार संघात शिवसेनेचे शेखर गोरे व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार मनोज पोळ यांना समान मते मिळाली. ऐनवेळी चिट्टीद्वारे घेतलेल्या कौलमध्ये शेखर गोरे विजयी झाले. तसेच कराड तालुक्यात विद्यमान सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांच्या विरुध्द दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या लढत झाली. यामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे निवडूण आले. पाटण तालुक्यात गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर यांच्यात लढत झाली. त्यात सत्यजित पाटणकर निवडूण आले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत जावळी तालुक्यात संघात राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे, कोरेेगाव तालुक्यात शिवाजीराव महाडिक, खटाव तालुक्यात नंदकुमार मोरे तर माण मतदार संघात मनोज पोळ व कराड तालुक्यात काँग्रेसचे उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना पराभवास सामोरे जावे लागले. निवडूण आलेले उमेदवार ज्ञानदेव रांजणे (अपक्ष), सुनील खत्री (मुळचे राष्ट्रवादीचे मात्र, सध्या शिवसेनेकडून), शेखर गोरे (कधी रासप तर कधी राष्ट्रवादी मात्र, सध्या शिवसेनेकडून) माजी आमदार प्रभाकर घार्गे (मुळचे राष्ट्रवादीचेच मात्र सध्या बंडखोरी), सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादीचे) व सत्यजित पाटणकर (राष्ट्रवादीचे) निवडूण आले आहेत. या निवडणूकीत काँग्रेसला भोपळा मिळाला तर राष्ट्रवादीला दोन जागेवर समाधान मिळाले. शिवसेनेने दोन जागा मिळवल्या मात्र, ते उमेदवार मुळेचे राष्ट्रवादीचेच असल्याने राष्ट्रवादीचा वरचष्मा बँकेवर राहणार हे निश्चित या पाच जागांकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण सहकार क्षेत्रातील तज्ञांचे लक्ष लागले होते.
जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार शशिकांत शिंदे एका मताने पराभूत झाले. या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच काही मातब्बर नेत्यांनीच शशिकांत शिंदे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवाराला ताकद दिल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदेंच्या समर्थकांनी करत राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. शशिकांत शिंदे यांचा ज्ञानदेव रांजणे यांनी एका मताने पराभव केला. यामुळे संतापलेल्या शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली. यावर शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या या कृतीबद्दल शिंदे यांनी माफी मागितली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे व अपक्ष ज्ञानदेव रांजणे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रांजणे कट्टर समर्थक आहेत. या निवडणुकीत सहकार पॅनल मधील काही नेत्यांनी शशिकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला आहे.
निवडणुकीत शशिकांत शिंदेना विजयी करा, असा निरोप खुद्द शरद पवार व अजित पवार त्यांनी जिल्ह्यातील मातब्बर श्रेष्ठींनी पाठविला होता. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचाही निरोप प्रमाण न मानता शशिकांत शिंदे यांना पाडण्याचे काम राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला. हा पराभव आपल्याच लोकांनी केल्याचे सांगत सुमारे 15 ते 20 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर तुफान दगडफेक केली. दगडफेकीनंतर कार्यकर्त्यांनी शशिंकांत शिंदे यांच्या नावाची घोषणाही केली.
COMMENTS