माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; 30 दिवसांत हजर न झाल्यास मालमत्ता होणार जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; 30 दिवसांत हजर न झाल्यास मालमत्ता होणार जप्त

मुंबई ः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या अर्जाला मुंबईच्या एस्प्लेन

अजब गाढवाची गजब कथा.. अंत्यविधि, सावडणे, श्राध्द विधीला जाणारे गाढव !
विश्‍वचषकाचा विजय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ः आमदार थोरात
धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना : उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई ः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या अर्जाला मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने परवानगी दिली आहे. परमबीर सिंग व रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. तर, परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या कालावधीत परमबीर सिंग जर न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केले आहे.
गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आता न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित केलं आहे. गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला होता. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल करून सिंग व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. जगताप म्हणाले होते की, आमच्याकडे आधीच आरोपींविरुद्ध तीन अजामीनपात्र वॉरंट आहेत, त्यामुळे आम्ही आरोपीला घोषित गुन्हेगार घोषित करण्यासाठी हा अर्ज करत आहोत.

COMMENTS