दुकाने बंद करण्यास भाग पडल्याने व्यापार्‍यांकडून प्रशासनाचा निषेध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुकाने बंद करण्यास भाग पडल्याने व्यापार्‍यांकडून प्रशासनाचा निषेध

शासनाने दोन दिवसांचा विक एंड जाहीर केल्यानंतर आज सकाळी दहिवडीमधील व्यावसायिकांनी नेहमी प्रमाणे दुकाने उघडली.

शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची स्पिरुलींना फार्मला भेट
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला वेग

म्हसवड / वार्ताहर :  शासनाने दोन दिवसांचा विक एंड जाहीर केल्यानंतर आज सकाळी दहिवडीमधील व्यावसायिकांनी नेहमी प्रमाणे दुकाने उघडली. त्यानंतर अचानक नगरपंचायत व पोलीस यंत्रणेने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांना दुकाने बंद करावयास भाग पाडले. नवीन आदेशानुसार लोकांना नाईलाजाने दुकाने बंद करावी लागली. त्रस्त झालेल्या दुकानदारांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. तडक प्रांत कार्यालयावर मोर्चा वळवला. प्रांत अधिकारी यांना भेटून निर्णय बदलावा, अशी मागणी केली. 

काल मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. पाच दिवस सर्व व्यवहार सुरळीत राहणार असा अर्थ सर्वांनी लावला होता. सर्वत्र चर्चाही तशीच होती. परंतू काल रात्री अचानक जिल्हाधिकारी यांनी फतवा काढला की जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.

या फतव्याचा अर्थ न समजल्यामुळे नागरिकांनी आज सकाळी नेहमी प्रमाणे दुकाने उघडली. सकाळी 10 वाजता पोलीस यंत्रणा व नगरपंचायत अशी संयुक्तपणे नागरिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अनेक हॉटेल व्यावसायिकांना तयार केलेले पदार्थ फेकून द्यावे लागले. अनेकांना कर्मचार्‍यांचे पगार द्यावे लागले. एकूणच फक्त दहिवडीमध्ये लोकांचे आज लाखो रुपयांचे नुकसान झाले. शासनाने व्यावसायिकांना एक दिवस आगोदर सांगणे गरजेचे होते. परंतू तसे न करता शासनाने रात्री सोशल मीडियावर आदेश जारी केला. आज त्यामुळे एकच धांदल उडाली. एकूच प्रशासनाने व्यावसायिकांना का वेठीस धरले आहे हा संशोधनाचा विषय झाला आहे. शनिवार, रविवार असा दोन दिवसांचा लॉकडाऊन ही जाहीर केला होता. मग अचानक हा निर्णय का फिरवला. असा प्रश्‍न ही अनेकांना पडला आहे.

त्रस्त झालेले दहिवडीचे व्यापारी यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे बोलताना व्यापारी यांनी सर्व दुकाने सुरू करा, अशी मागणी केली. आजपर्यंत सर्व व्यापार्‍यांचे सरकारमुळे खुप नुकसान झाले आहे. यापुढे आमच्या सहनशीलतेच्या पुढे विषय गेला आहे. असे सांगून विनंती केली, परंतु प्रांताधिकारी यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशापुढे काही करू शकत नाही असे सांगितले.

त्यामुळे 30 तारखेपर्यंत अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे सांगितले.

पुणे, मुंबई, कोल्हापूर येथील व्यापारी असोसिएशनला काही व्यापार्‍यांनी फोन केले असता त्यांनीही मोर्चा काढून विरोध दर्शविला आहे, असे सांगितले. 

आम्हाला हे समजत नाही की व्यापारी चोरीमारी करतो की पैसे लुबाडतो? कष्टानेच आणि घाम गाळून काम करतो. परंतू व्यापार्‍यालाच का सरकार धारेवर धरते हे समजत नाही. अशा प्रतिक्रिया ही लोकांच्या आल्या. शासनाच्या या निर्णयाचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविण्यात आला. कोरीनाची साखळी तोडणे यासाठी लॉकडाऊन करणे बरोबर आहे. गेल्या वर्षी सरसकट लॉकडाऊन केले. त्यामुळे फार मोठे नुकसान झाले. परंतू आता लॉकडाऊन सहन करण्याइतपत लोकांकडे पैसा नाही. दहिवडीमध्ये रुग्ण वाढल्यावर फेब्रुवारी व मार्चमध्ये, दहिवडी 17 दिवस बंद होती. त्यावेळी पूर्ण महाराष्ट्र सुरू होता. त्याच धर्तीवर ज्या शहरात, गावात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीत आढळत आहेत ती गावे व शहरे सिल करावीत सरसकट राज्यातील जनतेला बंद करायला सांगून अर्थ व्यवस्था ठप्प करण्याची गरज काय? असे ही मत व्यावसायिकांनी मांडले. शासनाने याचा पुनर्विचार नक्की करावा, अशी मागणी दहिवडी व्यापारी संघटनेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

ब्रेक द चेन

काल परवा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन असा असा संदेश देण्यात आला होता. तो राज्यभर गाजला. परंतू आज सरसकट लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्व सामान्यांना जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे एका ने ब्रेक द चेन याचा अर्थ सोन्याची साखळी मोडा व पुढचे पंचवीस दिवस जगा असा लावला आहे. यातील गमतीचा भाग सोडला तर हे भयावह वास्तव आहे हे नाकारता येणार नाही. व्यापारी वर्गाने बंद मुळे मोठे नुकसान सहन केले आहे. अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. मजुरी वर जगणारांचे हाल वाढणार आहेत. एकूणच गंभीर परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. सोन्याच्या साखळ्या अनेकांनी अगोदरच गहाण ठेवल्या असल्याचे ही सांगण्यात आले. कोरोना बाबत आम्ही खबरदारी घेऊ पण आम्हला जगू द्या अशी आर्त विनवणी शासनाला नागरिक करत आहेत.

COMMENTS