पद्म चे छद्म अर्थात नक्षलवादी कंगणा!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पद्म चे छद्म अर्थात नक्षलवादी कंगणा!

 कोणत्याही देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार हे राजकारणातील सत्ताकारणाच्या बाहेर असणारे आणि खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रात देशाचा ठसा उमटविणाऱ

मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे – आशिमा मित्तल
शिर्डीत मुलांनी तिरंग्यासह साकारला 75
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित मदत करू ः पालकमंत्री महाजन

 कोणत्याही देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार हे राजकारणातील सत्ताकारणाच्या बाहेर असणारे आणि खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रात देशाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्वांचा देशाच्या म्हणजे देशाच्या नागरिकांच्या वतीने एकप्रकारे सॅल्युट असतो. परंतु, भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांना फार पूर्वीच ग्रहन लागले आहे. त्यामुळे या पुरस्कारांचे गांभीर्य फार आधीच संपुष्टात आले आहे. एखाद्या उद्योगपती च्या घोळक्यात राहून त्याच्या आयपीएल टीमला राष्ट्रीय सर्वस्वी बहाल करणारा आमचा भारतरत्न राहू शकतो इथपासून झालेली सुरुवात कालच्या पद्म पुरसकार स्विकारणाऱ्यांमध्ये कंगणा नावाचा समावेश करून घेण्याइतपत त्या पुरस्काराची प्रतिष्ठा रसातळाला नेली!  ही बाब इथपर्यंतच थांबली असती तरी राष्ट्रीय इभ्रत काहीशी बाकी राहीली, असे म्हणता आले असते. परंतु, देशाला स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असे जेव्हा नाचगाणे करणारी कंगणा नावाची न(क)टी बरळली तिने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे, स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्र निर्माण करणाऱ्या सर्व महानायकांचा इतिहास रसातळाला मिळवला. परंतु, ही बाब एवढ्यावर थांबत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही, अशी विसंगत विचारसरणी या देशात फक्त आणि फक्त नक्षलवादी विचार मांडतो. त्यामुळे भारताला २०१४ पर्यंत स्वातंत्र्य नव्हते हे वक्तव्य करणाऱ्या कंगणाचे नक्षलवादी कनेक्शन आता गुप्तचर यंत्रणांनी शोधून काढावे! अर्थात, कंगणाने केलेले वक्तव्य हे नक्षलवादी विचारांचे तर आहेच, परंतु, आर‌एस‌एस सारख्या संघटनेवर जो आरोप होत आला की, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत कधीच सहभाग घेतला नाही, त्यांचे अनेक नेते ज्यात वाजपेयी सारंख्यावर देखील जाहीर आरोप वारंवार केले गेले की त्यांनी स्वातंत्र्य सेनानींच्या विरोधात आणि इंग्रजांना शरण जाण्यात धन्यता मानली होती, या सर्व आरोपांवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केला. कंगणा सारख्या निव्वळ तिसऱ्या दर्जाच्या अभिनेत्रीने केलेल्या या जाहीर वक्तव्याविरोधात संपूर्ण देश तुटून पडला असताना आर‌एस‌एस सारखे संघटन मात्र चोरून चोरून फक्त बघते आहे! याचा सरळ अर्थ असाच घ्यावा का की, कंगणाच्या तोंडून संघाने स्वतः:ची भूमिका वदवून घेतली का?       कंगणाचे मुर्खपणाचे वक्तव्य हे पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर येते याचा दुसरा अर्थ हा देखील आहे की, सध्या गेल्या काही वर्षांपासून पद्म पुरस्कारांची जी निवड होते आहे, त्यात फक्त ‘संघोत्री’ प्याद्यांचा समावेश केला जातो आहे का? या संशयाला पुष्टी मिळते. अर्थात सरकार ज्या विचारांचे असेल त्या विचारांच्या लोकांना थोडे झुकते माप देणे कदाचित समजून घेता येईल, परंतु, आख्खी यादीच संघोत्रीं ची असणं ही बाब राष्ट्रविरोधी आहे. त्यातच विदेशातील एखाद्या व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला पुरस्कार देणे समजू शकतो, परंतु असा पुरस्कार राजकीय नेत्याला देण्यातून या पुरस्कारांना ठरविण्या अंबानी-अदानी यांचाही प्रभाव दिसतो. कारण जपानी सत्ताकारणातील व्यक्तीची निवड करण्यामागे सरकारी लूट करणाऱ्या उद्योगपतींची नियत साफ नाही!      सर्वोच्च नागरी पुरस्कार दिलेल्या व्यक्तिमत्वांसमोर देश म्हणजे देशातील नागरिक नतमस्तक होतात. कारण ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांची निवड केली जाते त्या क्षेत्रातील ते उत्तुंग व्यक्तिमत्व असतात; आणि राष्ट्राला भरिव योगदान देण्यात त्यांचा महत्वपूर्ण वाटा असतो. परंतु, गेल्या काही वर्षांतील पद्म पुरस्कार हे नागरिकांच्या हेटाळणीचे ठरले आहेत. अशा प्रकारची निवड एक राष्ट्रीय नागरिक म्हणून लोकांना मान्य नसल्याचे कंगणावर होणाऱ्या टिकेच्या माध्यमातून दिसते आहे. पद्म पुरस्कारांची इभ्रत वाचवायची असेल तर कंगणाला नक्षलवादी घोषित करा ही जाहीर मागणी आम्ही करित आहोत!

COMMENTS