Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गॅस दरवाढीचे परिणाम; गावोगावी पुन्हा पेटल्या चुली

पाटण / प्रतिनिधी : पेट्रोल डिझेल बरोबरच गेल्या काही महिन्यात सतत होत असलेल्या गॅस दरवाढीने पाटण ग्रामीण भागासह पाटण सारख्या शहरी भागातही पुन्हा च

पोलिसांनी अवैध व्यवसाय बंद न केल्यास भाजपा बंद करणार : धैर्यशील मोरे
थंडीच्या काळात लहान मुलांतील श्‍वसनविकार बळावण्याचा धोका
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू

पाटण / प्रतिनिधी : पेट्रोल डिझेल बरोबरच गेल्या काही महिन्यात सतत होत असलेल्या गॅस दरवाढीने पाटण ग्रामीण भागासह पाटण सारख्या शहरी भागातही पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत.
गॅस दरवाढीने शेतकरी शेतमजूर हतबल झाले असून गड्या आपली चुलच बरी असे ते म्हणू लागले आहेत. ग्रामीण भागात महिला पुन्हा सरपण गोळा करताना दिसू लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या उज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अगदी ग्रामीण भागात गॅस पोचवला. त्यावेळी गॅस सिलेंडरची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी होती. तसेच अनुदानही मिळायचे, आता मात्र अनुदान मिळत नाही आणि भावही एक हजाराच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे सिलेंडर भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल शेतकरी शेतमजूर विचारु लागले आहेत. यामुळे पाटण तालुक्यात उज्ज्वला योजनेतून मिळालेले गॅस शेगडी, बाटला अडगळीत धूळ खात पडलेले दिसत आहेत. एक सिलेंडर शहरी भागांमध्ये सुमारे 850 रुपये ग्राहकांना मोजावे लागतात तर ग्रामीण भागामध्ये 930 रुपये मोजावे लागतात.
त्यामुळे अनेक पुन्हा आपली चुलत बरी असे म्हणत असल्याचे ग्रामीण भागांमध्ये दिसून येत आहे. ग्रामीण भागात रस्त्याच्या बाजूने महिला पुन्हा सरपण गोळा करताना दिसून येत आहेत.
चौकट –
केंद्र राज्य सरकारचा कर अनु सिलेंडरचा भाव गॅस सिलेंडरची खरी किंमत 480 रुपये इतकी आहे. केंद्र राज्य सरकारांचे कर वाहतूक खर्च धरून सिलेंडर जवळपास साडेनऊशे रुपयापर्यंत केंद्र सरकारचा कर, पंचवीस रुपये वाहतूक खर्च, दहा रुपये असे केंद्राकडून येताना एकूण 530 रुपये अंदाजी येतो. राज्य शासनाचा कर 292 रुपये राज्यातील ट्रान्सपोर्ट खर्च 15 रुपये डीलर कमिशन अनुदान या सर्व गोष्टी मिळून जवळपास एक सिलेंडर शहरी भागांमध्ये सुमारे 850 रुपये ग्राहकांना मोजावे लागतात तर ग्रामीण भागामध्ये 930 रुपये मोजावे लागतात. एकीकडे सर्वसामान्य जनता दुष्काळाच्या परिस्थितीमुळे हैराण झाली असताना त्यात ही दरवाढ अजून डोकेदुखी ठरत आहे.
विकास हादवे (स्वाभिमानी शेतकरी संघटना पाटण तालुका अध्यक्ष)

COMMENTS