मुंबई : कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देता आल्या नाही त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल
मुंबई : कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देता आल्या नाही त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी याला मान्यता देण्यात आली असल्याचे दत्ता भरणे यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विविध संवर्गाच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. खासदार संभाजी छत्रपती यांनी देखील विद्यार्थ्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
COMMENTS