मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर मलिक यांनी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे मलिक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे वाटत असतांनाच, त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी राजकारणांचे गुन्हेगारीकरण केले असून, हा रियाझ भाटी कोण आहे? हा बनावट पासपोर्ट प्रकरणात पकडला गेला होता. दाऊद आणि इतर टोळ्यांशी ह्याचे संबंध असल्याचे सर्वांना माहिती होते, असा गंभीर आरोप केला.
मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर काही मिनिटांतच आशिष शेलार यांनी रियाज भाटिया याचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवारांसोबत भाटिया यांचे फोटो उघड केले. त्यामुळे रियाझ भाटियाचे फोटो फक्त फडणवीस यांच्यासोबत नसून, विविध पक्षांतील राजकीय नेत्यांसोबत असल्याचे सांगून मलिक यांच्या बॉम्बमधील हवाच काढून घेतली. त्यामुळे इतक्या दिवसांपासून रोज गौप्यस्फोट करणारे मलिक यांच्या आरोपांतील हवाच काढून घेतली. शिवाय राज्यात विविध ठिकाणी भाजपच्या युवा मोर्चाकडून मलिक यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आल्यामुळे फडणवीस-मलिक हा सामना चांगलाच रंगतांना दिसून येत आहे.
माध्यमांना संबोधित करतांना मलिक म्हणाले की, एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या लढाईला देवेंद्र फडणवीस दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस त्या अधिकार्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्या अधिकार्याचे आणि फडणवीसांचे जुने संबंध आहेत. 2008 मध्ये आलेला अधिकारी 14 वर्षे मुंबईतच आहे यामध्ये काय कारण आहे. देवेंद्र फडणवीस दुसर्यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले? मुन्ना यादव नावाचा एक कुख्यात गुंड ज्याच्यावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तो तुमचा राजकीय साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष बनवले होते की नाही. तुम्ही हैदर आजम नावाच्या एका नेत्याला मौलाना आझाद फायन्सान कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवले होते की नाही. हैदर आजम बांग्लादेशातल्या लोकांना मुंबईत आणण्याचे काम नाही करत का? हैदर आजमची दुसरी पत्नी जी बांग्लादेशी आहे ज्याची चौकशी मालाड पोलिसांनी केली होती. पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून ते प्रकरण दाबण्याचे काम तुम्ही केले होते की नाही. तुमच्या इशार्यावर संपूर्ण महाराष्ट्रात वसुलाची काम होत होते की नाही. मुंबईच्या बिल्डरांच्या जागेचे भांडणवरुन पोलिसांत तक्रार करुन वसुली केली जात होती की नाही. जमिनींच्या मालकांना पकडून आणून त्या आपल्या नावावर केल्या जात होत्या की नाही. तुमच्या कार्यकाळात परदेशातून कुख्यात गुंड फोन करायचे, असे मलिक म्हणाले.
रियाज भाटी याचे राष्ट्रवादी, शिवसेनेशी संबंध; आशिष शेलार
नवाब मलिक यांची आम्हाला काळजी वाटते. त्यांचे मानसिक संतुलन ठीक रहावे, अशी अपेक्षा आहे. रियाज भाटी हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. त्याचे राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत, असा पलटवार भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला. ‘वाझे वसुली प्रकरणात रियाज भाटीचे नाव आले आहे. त्यानंतर रियाज भाटीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन गेले. त्यामुळे त्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. वाझे प्रकरणात रियाज भाटीचे नाव आले आहे. त्यामुळे त्याला कस्टडीत घेतले तर अनेक बाबी समोर येतील त्यामुळे त्याला राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवले आहे. तसेच रियाज भाटी याचे पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेले फोटो समोर आणून त्यांनी मलिक यांच्या आरोपातील हवाच काढून टाकली.
’डुकराशी कधीही कुस्ती करू नये’ : फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी जॉर्ज बर्नाड शॉ यांचे वाक्य ट्वीट करत डुकराशी कधीही कुस्ती करू नये असा टोला लगावला आहे. त्यांचे हे ट्वीट राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना उद्देशून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नवाब मलिक यांनी आरोपांचा हायड्रोजन बॉम्ब फोडू असे म्हंटले होते. यासंदर्भात मलिक यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर फडणवीस यांनी जॉर्ज बर्नाड शॉ वाक्य ट्विट केले. फडणवीस म्हणाले की, खूप पूर्वीच एक गोष्ट शिकलोय, डुकराशी कधीही कुस्ती करू नका. कारण, तुम्ही गलिच्छ व्हाल आणि डुकराला तेच आवडेल अशा आशयाचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.
COMMENTS