Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरडगांव येथील जयश्री अडसूळ बेपत्ता

लोणंद / वार्ताहर : तरडगाव, ता. फलटण येथील सौ. जयश्री तुकाराम अडसूळ, (वय 51) ही विवाहिता बेपत्ता झाली आहे. याबाबतचा जबाब मुलगा रणजित तुकाराम अडसूळ

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने आपला पक्ष संपविला : आ चंद्रकांत पाटील
भोंगा वाजला की टीव्ही-मोबाईलसह इंटरनेट होणार बंद : वहागाव ग्रामपंचयातीचा निर्णय
गोंदवले येथील फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; लाखोचे नुकसान; चारजण जखमी

लोणंद / वार्ताहर : तरडगाव, ता. फलटण येथील सौ. जयश्री तुकाराम अडसूळ, (वय 51) ही विवाहिता बेपत्ता झाली आहे. याबाबतचा जबाब मुलगा रणजित तुकाराम अडसूळ यांनी 1 ऑक्टोबर रोजी लोणंद पोलीस ठाण्यात दिला आहे.
पोलिसांत दिलेल्या जबाबात असे म्हटलेले आहे की, सौ. जयश्री तुकाराम अडसूळ ह्या रविवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी घरात कोणीही नसताना तसेच कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. घरातील कुटूंबियांनी सर्व नातेवाईक व परिचितांकडे संपर्क साधला असता त्या मिळून आल्या नाहीत. ही विवाहिता गेली आठ दिवसांपासून बेपत्ता झाली असल्याने कुटुंबातील सदस्य नातेवाईक चिंतेत आहेत. ही महिला कोणाच्या निदर्शनास आल्यास 9579690617 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रणजित तुकाराम अडसूळ यांनी केले आहे.

COMMENTS