श्रीनगर/वृत्तसंस्था - नौशेरामध्ये त्यांनी तैनात असलेल्या जवानांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना आपण न
श्रीनगर/वृत्तसंस्था – नौशेरामध्ये त्यांनी तैनात असलेल्या जवानांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना आपण नौशेरामध्ये पंतप्रधान म्हणून आलेलो नसून इथल्या जवानांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलो असल्याचे मोदी म्हणाले. प्रत्येकाला वाटते की आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी. मलाही वाटते की मी दिवाळी माझ्या कुटुंबासोबत साजरी करावी. म्हणूनच मी इथे दिवाळी साजरी करतो. कारण तुम्ही माझे कुटुंबीय आहात. मी इथे पंतप्रधान म्हणून आलेलो नाही. मी तुमच्या परिवारातला एक सदस्य म्हणून आलोय. आपल्या कुटुंबियांसोबत आल्यानंतर जसे वाटते, तसेच तुमच्यासोबत आल्यावर मला वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
मी एकटा नाही आलोय. मी माझ्यासोबत 130 कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणले आहेत. आज संध्याकाळी भारताचा प्रत्येक नागरीक दिवाळीनिमित्ताने एक दिवा लावून तुमच्या वीरत्वासाठी, तुमच्या शौर्यासाठी, तुमच्या पराक्रमासाठी लावून तुम्हाला अनेकानेक शुभकामना देईल, असं देखील मोदी यावेळी म्हणाले. 2019 मध्ये 370 कलम हटवल्यानंतर गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी दिवाळीच्या निमित्ताने राजौरी जिल्ह्यातील सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक वर्षी सैन्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सीमाभागात जातात. तिथे त्यांच्यासोबत वेळ घालवतात. मिठाई वाटतात. याआधी देखील मोदींनी जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि इतर ठिकाणी सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेवरील माणामध्ये तैनात असलेल्या भारतीय तिबेट सीमा पोलिस सैन्यासोबत दिवाळी साजरी केली होती. 2017 साली पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये तैनात सैनिकांसोबत आनंदाने दिवाळी साजरी केली होती. याचप्रमाणे 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमध्ये चीनच्या सीमेवरील सैन्यासोबत दिवाळी साजरी केली होती.
भारतीय सैन्याने प्रत्येक कारवाईला प्रत्युत्तर दिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी देखील आपली दिवाळी भारतीय सैन्यासोबत मोठया उत्साहात साजरी केली. जम्मूतील नौशेरा सेक्टरमध्ये सैन्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नौशेराने प्रत्येक युद्धाचे, प्रत्येक कट-कारस्थानाचं प्रत्युत्तर दिलं आहे. स्वातंत्र्यानंतर शत्रूंनी या भागावर नजर ठेवली आहे. पण मला आनंद आहे की नौशेराच्या वीरांच्या शौर्यासमोर सर्व कारस्थोने अपयशी ठरली आहेत. भारतीय सैन्याची ताकद काय असते, याचा अंदाज शत्रूला सुरुवातीच्या दिवसांमध्येच आला होता, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
COMMENTS