तापमानवाढीचे संकट पेलतांना …

Homeताज्या बातम्यासंपादकीय

तापमानवाढीचे संकट पेलतांना …

हवामान बदल आणि तापमान वाढीबाबत अनेक इशारे देऊन देखील आपण त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. या संकटाचा सामना आणि उपाययोजना करण्यासाठी रविवारी 31

राज्यपालांसाठी मार्गदर्शक सूचनांची चाचपणी
ऐतिहासिक करार
एक देश, एक निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह

हवामान बदल आणि तापमान वाढीबाबत अनेक इशारे देऊन देखील आपण त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. या संकटाचा सामना आणि उपाययोजना करण्यासाठी रविवारी 31 ऑक्टोबंर रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्रांची 26 वी हवामान बदल परिषद संपन्न झाली. या परिषदेत उपाययोजनांवर चर्चा झाली असली तरी, विकसनशील देश कार्बन उर्त्सजन रोखण्यास सकारात्मक नसल्याचे चित्र यातून दिसून येते.

जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढू नये, यासाठी वार्षिक कार्बन उत्सर्जन नियंत्रणात राहील यासाठी कृती करण्याची उर्जा गेल्या तीन दशकांमध्ये मिळाली. आपण अल्प कार्बन तरतुदीतूनही जागतिक तापमान 1 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी ठेवू शकतो, असे काही पुराव्यांमधून स्पष्ट झाले आहे. सध्या प्रती वर्ष सुमारे 34 अब्ज टन कार्बन उत्सर्जन होत असतो. हे पाहता कार्बन नियंत्रणासाठी केलेली तरतूद आपल्याला दहा वर्षांच्या आधीच कमी पडू शकते. त्यामुळेच सन 2030 चे महत्त्व तेथे दिसून येते. भारत हा देश केवळ सांस्कृतिकदृष्ट्याच विविधतेने नटलेला नाही तर भौगोलिक व नैसर्गिक विविधतेनेही संपन्न आहे. पण या प्रत्येक बाबीचे काही गुण असतात तसे दोषही असतात. भारत हा मौसमी हवामानाचा प्रदेश असल्यामुळे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तीनही ऋतुंचा हवामानाचा प्रभाव येथील वातावरणात निश्‍चितपणे पडलेला असतो. सध्या सुरु असलेल्या उन्हाळामुळे राज्यातच नव्हे तर देशभर तापमानवाढीची लाट आली आहे. देशभरातील अनेक जिल्ह्यात ऐन मार्चमध्येच तापमानाने चाळीसी ओलांडली आहे. तर मार्चच्या शेवटच्या काही दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यात 42 ते 45 अशं सेल्सिअस पर्यंत तापमान पोहचले आहे. तापमानवाढीची समस्या ही गंभीर समस्या असून, ती मानवी जीवनावर परिणाम करत असतांना दिसून येत आहे. तापमानवाढ ही ऋतुचक्र आणि हवामानावर परिणाम करतांना दिसून येते. त्यामुळेच अति पाऊस, ढगफुटी, वादळे, महापूर, थंडी, आणि उष्णतेची लाट, रोगराई, अशा अनेक नैसर्गिक संकटांना आज अनेक देशांना सामना करावा लागत आहे. पर्यावरणाचा र्हास झाल्यामुळे उष्णतेत वाढ, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठीच शाश्‍वत विकासाची संकल्पना पुढे आली. देशाचा राज्याचा विकास साधत असतांना पर्यावरणपुरक विकास साधणे गरजेचे आहे. मात्र याकडे डोळेझाक करणे चालू आहे, परिणामी यामुळे सर्वसामान्यांना व्यक्तींना जेव्हा आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडावे लागते तेव्हाच अशा व्यक्ती उष्माच्या बळी पडून आपला जीव गमावतात. पर्यावरणाकडे सातत्याने दूर्लक्ष केल्यामुळे, झाडांच्या कत्तली अलिकडच्या काळात मोठया प्रमाणावर होत आहे. शहरांमध्ये तर झाडांची संख्या घटल्याने तापमान मोठया प्रमाणात वाढत आहे. तसेच वाढत्या तापमानाबरोबरच अतिनील किरणांचाही मोठा त्रास भोगावा लागत आहे. या किरणांचे प्रमाण सध्या प्रमाणापेक्षा अधिक आढळले आहे. औद्योगीकरणाद्वारे करोडो रूपये कमावणारे, विकासाच्या नावाखाली पर्यावरणासाठी खेळणारे, यांना या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणावा तसा जाणवत नाही, कारण आरामदायी ऑफिसमध्ये एसीच्या थंडगार वातावरणामध्ये राहणार्यांना मात्र त्याची झळ जाणवत नाही त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांनाच बसतो, आणि त्याचे पर्यावसान त्यांना आपला जीव गमवावा लागतो. एप्रिल व मे महिन्यापूर्वीच म्हणजे मार्चमध्येच विविध शहरांचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे मार्चमध्येच उन्हाळा असह्य झाल्याचे दिसून येत आहे. विदर्भात तर मार्चमध्येख जनजीवन विस्कळित झाले आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्हयाचे तापमान जवळपास 42-44 अंश सेल्सिअस झाले आहे. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणात उष्णतेची मोठया प्रमाणावर लाट आहे. या उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांनी काय करावे अथवा काय करु नये याबाबत शासनाच्या महसूल विभागाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. एवढेच नव्हे तर उष्णतेच्या कालावधीत नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी सूचनाही जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

COMMENTS