कत्तलखाने पुन्हा सुरू होणार नाही, याची खबरदारी घ्या : नगराध्यक्ष वहाडणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कत्तलखाने पुन्हा सुरू होणार नाही, याची खबरदारी घ्या : नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव शहर/प्रतिनिधी : गोवंशप्रेमींच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर काल कोपरगाव शहरातील बेकायदा कसाईखाने, शेड, आडोसे हटविण्यात आल्याने शहरात सर्व नागरि

पढेगाव सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने समारोप
नगर अर्बन वाचवण्यासाठी भाजप सरसावले ; सत्ताधार्‍यांचे खा. विखेंनंतर मंत्री कराडांना साकडे
देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान-अरविंद धिरडे

कोपरगाव शहर/प्रतिनिधी : गोवंशप्रेमींच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर काल कोपरगाव शहरातील बेकायदा कसाईखाने, शेड, आडोसे हटविण्यात आल्याने शहरात सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुन्हा गोवंश हत्या होऊ नयेत यासाठी आता प्रशासनाबरोबरच सर्व जनतेनेही सावध रहाणे फारच गरजेचे आहे.असे प्रतिपादन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय व हाडणे यांनी केले.
या वेळी वहाडणे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले की, गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईत जवळपास 350 गोवंश जप्त करण्यात आले होते. त्यातील बहुतांश जनावरे ही बैलबाजारच्या मैदानात व परिसरात ठेवलेली होती. आता मी कोपरगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संबंधित अधिकारी-पदाधिकारी व नेत्यांना जाहीरपणे इशारा देऊन ठेवतो कि, गुरांचा (जनावरांचा) आठवडे बाजार भरतो त्याठिकाणी अनधिकृत गोवंश ठेवलेले आढळल्यास कोपरगावात निर्माण होणार्‍या असंतोषास संबंधिताना तोंड द्यावे लागेल हे लक्षात घ्यावे. यानंतर गोवंशहत्या करणार्‍या कसायांची अनधिकृत जनावरे पैसे घेऊन या जागेत ठेवली असे लक्षात आल्यास अनर्थ होईल यात कुणीही शंका बाळगू नये. यानंतर या विषयावर कुणी निवेदन-अर्ज-विनंत्या करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीने वाट पाहू नये. शहरातील वातावरण बिघडणार नाही याची जबाबदारी बेकायदेशीर-चुकीचे काम करणार्‍यांची आहे याचे भान अधिकारी-पदाधिकारी-नेते ठेवतील अशी अपेक्षा आहे.असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्ध केले आहे.

COMMENTS