महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आज रत्नागिरी मध्ये महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी यु
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आज रत्नागिरी मध्ये महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी युवासेनेच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात सायकल, बैल गाडी घोडा व घोडागडी रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर गॅस,पेट्रोल,डिझेल,च्या किंमती त्याच प्रमाणे वाढलेली महागाई याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.यावेळी शेकडो शिवसैनिक व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
COMMENTS