Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जोतिबा मंदिर परिसरातील तीन दरवाजे भाविकांसाठी खुले

वाडीरत्नागिरी / वार्ताहर : जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिर परिसरातील तीन दरवाजे भाविकांसाठी खुले केले. यामुळे भाविक, ग्रामस्थ, पुजार्‍यांमध्ये समा

Ahmednagar : नगरमध्ये मंदिरातील पुजारीच फैलावतात कोरोना (Video)
श्रीगोंद्यातून सव्वासहा लाखांचा गुटखा जप्त
ओबीसींचा कैवार नव्हे; सद्दी संपली ! 

वाडीरत्नागिरी / वार्ताहर : जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिर परिसरातील तीन दरवाजे भाविकांसाठी खुले केले. यामुळे भाविक, ग्रामस्थ, पुजार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवापासून जिल्हा प्रशासनाने डोंगरावर ई-पास दर्शन पध्दत सुरू केली होती. यामुळे 60 टक्के भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही. या पध्दतीस भाविकांनी विरोध दर्शविला होता.
मंदिर परिसरातील पारंपरिक दर्शन रांगा सुरू करा. तसेच मंदिर परिसरातील सर्व दरवाजे खुले करा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी, आ. विनय कोरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली होती. याबाबत बैठक झाली. त्यात जिल्हाधिकारी रेखावार यांनी भाविकांची मागणी मान्य करून दरवाजे खुले करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार दक्षिण, पश्‍चिम, उत्तर दरवाजे उघडण्यात आले.
भाविकांना, पुजार्‍यांना पश्‍चिम दरवाजातून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. तर दक्षिण व उत्तर दरवाजातून बाहेर पडता येणार आहे. दरवाजे खुले करताना पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे, संतोष शिंगे, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते.

COMMENTS