अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटी परिवर्तन मंडळाचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी सोसायटीच्या राहुरी व श्रीरामपूर शाखेस भेट देवून तेथील
अहमदनगर (प्रतिनिधी)-
माध्यमिक शिक्षक सोसायटी परिवर्तन मंडळाचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी सोसायटीच्या राहुरी व श्रीरामपूर शाखेस भेट देवून तेथील संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतला. शाखेतील कर्मचार्यांच्या व सभासदांच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा केली.
बोडखे यांनी शाखेतील कर्मचार्यांचे हजेरीपत्रक, हालचाल रजिस्टर, पत्रव्यवहाराचे आवक-जावक रजिस्टर, अ वर्ग व ब वर्ग (ऐच्छिक ठेवी) बद्दलची माहिती जाणून घेतली. डेड स्टॉक मटेरिअल, जुने संगणक व त्याजागी नवीन खरेदी केलेले संगणक, मयत सभासद बांधवांचे शेअर्स, कायम ठेव, वर्गणी, प्रत्येक शाखेत दरदिवशी होणारा व्यवहार (कर्जरोखे, कर्ज जमा) कॅशबुक, शाखा तपासणीस यांचे अहवालाची प्रत्यक्ष पहाणी केली. स्थानिक पातळीवर किरकोळ स्वरूपाच्या त्रुटीबाबत संबंधितांना त्यांनी सूचना केल्या. तर शाखांच्या कामकाजाबाबत इतर महत्वाच्या आवश्यक त्रुटीबाबतची चर्चा संचालक मंडळाच्या मासिक बैठकित करण्यात येणार आहे. संस्थेच्या व सभासदहिताच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलण्यासाठी सर्व संचालक मंडळासमोर विषय ठेवणार असल्याचे संचालक बोडखे यांनी सांगितले.
COMMENTS