Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांचे वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार : सरकारचे नवे फर्मान

कराड / प्रतिनिधी : सरकारचे नवे फर्मान शेतकर्‍यांचे वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार असल्याचे पत्र साखर संचालकांच्या सोबत बैठकीनंतर आयुक्त शेखर गायकवाड या

शेतकर्‍यांच्या मदतीचा निर्णय लवकरच
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरीता प्रयत्न करणार :मंत्री छगन भुजबळ
अखेर हेळगाव चिंचणी रस्त्याच्या कामाला सुरुवात

कराड / प्रतिनिधी : सरकारचे नवे फर्मान शेतकर्‍यांचे वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार असल्याचे पत्र साखर संचालकांच्या सोबत बैठकीनंतर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सर्व साखर कारखान्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच या निर्णयाला विरोधही होवू लागला असताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी असा निर्णय यापूर्वीच झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
शेतकर्‍यांच्या मोटारीचे वीज बिल कारखान्यांकडे असलेल्या ऊस बिलाच्या माध्यमातून वसूल करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आज पुण्यात साखर संचालकांसोबत वीज वितरण कंपनीच्या आधिकार्‍यांची बैठक झाली. साखर संचालक शेखर गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सर्व साखर कारखान्यांना या संदर्भातील पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. 29 रोजी दुपारी चार वाजता ही ’ऑनलाईन’ बैठक झाली. बैठकीत शेतकर्‍यांचा वीजबिल वसूल करण्याचा निर्णय घेतला असल्याने साखर आयुक्तांवरही नाराजी दिसू लागली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकार व महावितरण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ही वसुली योजना महावितरणने आखली आहे. राज्य सरकारच्या साखर संचालकांमार्फत अमंलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना त्रास देण्याचा उद्योग राज्य सरकार करत असल्याचे कृतीवरून दिसत आहे.
वीजबिल वसुली करून दिल्यास साखर कारखान्यांना लाभ : ना. बाळासाहेब पाटील
महावितरणने पूर्वी निर्णय घेतला. वीजबिल वसुली वेळेवर होत नाहीत, ज्या संस्था यामध्ये सहकारी कारखानदार यांनी जर वीजबिलाची वसुली करून दिली तर त्याच्या काही प्रमाणातील लाभ सहकारी संस्थाना द्यायचा असा निर्णय पूर्वीच झाला आहे. त्या संदर्भात साखर आयुक्तांनी बैठक आयोजित केली होती. यामध्ये बर्‍याच शेतकर्‍यांना प्रत्यक्ष वीजबिल भरण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी हा नविन उपक्रम हाती घेण्याचा निर्णय झाला आहे. मूळ हा निर्णय पूर्वीच झाला आहे. महावितरण कंपनी अनेक प्रकारचे वसुली करण्याचा संकल्पना राबविली आहे. त्यामध्ये सहकारी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा ही संकल्पना त्यामध्ये होती, असे स्पष्टीकरण ना. पाटील यांनी दिले आहे.
वीजबिल वसुल कारखान्यांवर लादणे चुकीचे : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
नविन माहिती सोशल मिडियावर आली आहे. परंतू हा विषय तक्रारीचा होणार आहे. पाणीपट्टी कपात करण्यावरून अनेकदा भांडणांचा विषय कारखान्यांशी शेतकर्‍यांशी झालेला आहे. वीज बिलाबाबत अनेक तक्रारी आहेत. वीजकंपनी वसुलीचे पैसे घेवून रिकामे होईल. मात्र, कारखान्यांशी वादाचा विषय होवू शकतो. वसुलीबाबत फेरविचार करणे गरजेचे आहे. वसुलीचा विषय अडचणीचा होणार आहे. त्याला कारखान्यांवर वसुली लादणे बरोबर नाही. ऊस बिलातून वीज बिलाची वसुलीचा निर्णय करणार असतील करू नये, असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

COMMENTS