राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशा वेळी ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशा वेळी ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही. मात्र हेच मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात ठाकरे सरकारला लगावला.
आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.आता पर्यंत राज्यात अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र आत्तापर्यंत एक ही राज्य सरकारचा मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही असे असताना दुसरीकडे मात्र ठाकरे सरकार मधील मंत्री ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या सुटके बाबत प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. सरकार ड्रग्ज आणि गांजा माफियांच्या मागे असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.
COMMENTS