सातारा / प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना 16 टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करावा. कोविड काळातील वैद्यकीय बिलांची रक्कम अद्या
सातारा / प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना 16 टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करावा. कोविड काळातील वैद्यकीय बिलांची रक्कम अद्याप मिळाली नसून ती तत्काळ वर्ग करावी. यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकार्यांनी जिल्हा विभागीय कार्यालयाबाहेर धरणे धरण्यात आली. दरम्यान, गुरुवारी कर्मचारी संप करणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आले. दरम्यान, राज्य परिवहन विभागाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या बंदचा फटका इच्छित ठिकाणी निघालेल्या प्रवाशांना बसला आहे.
गुरुवारी सकाळी-सकाळी बसस्थानकातून गाड्या सुटणार नाहीत. याबाबत माहिती देण्यासाठी बसस्थानकात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विविध बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना नाहक त्रासास सामोरे जावे लागले. राज्य शासनाने शासकीय कर्मचार्यांना डिसेंबर 2019 पासून 5 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात आला. परंतू, आता भत्त्यात वाढ करून 28 टक्के केला आहे. त्यामुळे 16 टक्के भत्ता तत्काळ लागू करावा, थकीत महागाई भत्ता देण्यात यावा. सणांची उचल 12 हजार 500 देण्यात यावी. एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांचे पैसे रखडले आहेत. ते तत्काळ देण्यात यावे, समायोजन श्रेणीतील आदेश तत्काळ दिले जावेत. वार्षिक वेतनश्रेणीची कमी केलेली टक्केवारी पूर्ववत करावी. दिवाळी बोनस 15 हजार रुपये मिळाला पाहिजे. या मागण्या वारंवार मांडूनही पूर्ण केल्या जात नसल्याचे सर्व संघटना संपात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी संयुक्त कृती समितीचा विजय असो, हमारी एकता हमारी ताकद, हम सब एक है, कामगार एकजुटीचा विजय असो, हमारी युनियन हमारी ताकद, थकीत महागाई भत्ता मिळालाच पाहिजे, अशा देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी संघटनेचे विभागीय सचिव ज्ञानेश्वर घोणे, सुहास जंगम, धनाजी जाधव, आर. आर जाधव, पवन फाळके, शेखर कोठावळे, मोहन कणसे, हेमलता कदम, रहेना इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS