‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई : काल दि. 26 ऑक्टोबर, 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर साक्ष होती. त्यावेळी जलसंधारण सचिवांनी सादर केल

चासनळी व परिसरातील भाविकांची नर्मदा परिक्रमा उत्साहात
राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा | LOKNews24
एड्सग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ‘ई निरंतर’ सेवा

मुंबई : काल दि. 26 ऑक्टोबर, 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर साक्ष होती. त्यावेळी जलसंधारण सचिवांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे सदर बातमी प्रसृत करण्यात आलेली आहे. परंतु, CAG ने उपस्थित केलेल्या मुद्दयांवर विभागाच्या सचिवांनी आपली साक्ष नोंदविलेली आहे व ही आकडेवारी योजनेची अंमलबजावणी करणा-या यंत्रणेने स्वतः दिलेली आहे.
या अभियानाची सविस्तर चौकशी करण्यासाठी शासनाने SIT नेमलेली होती. त्याप्रमाणे सुमारे 71% कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सदर SIT च्या अहवालाप्रमाणे शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी SIT च्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नाही. ही सर्व चौकशी चालू असताना शासनाने जलयुक्त शिवार अभियानाला क्लिनचिट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

COMMENTS