सातारा / प्रतिनिधी : गेल्या 58 वर्षापासून जिल्ह्यात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन झाले नव्हते. त्याचबरोबर कोरोनामुळे कुस्ती क्षेत्राला उतरती
सातारा / प्रतिनिधी : गेल्या 58 वर्षापासून जिल्ह्यात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन झाले नव्हते. त्याचबरोबर कोरोनामुळे कुस्ती क्षेत्राला उतरती कळा लागली होती. जिल्ह्यात कुस्ती क्षेत्राला नव्याने चालना देण्यासाठी निकाळजे ग्रुप व एन. बी ग्रुपच्या वतीने दि. 26 ते 28 ऑक्टोंबर दरम्यान सातारा मेगाफूड पार्क येथे कुस्ती स्पर्धेचे आयोज करण्यात आले आहे. ही माहिती बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. या वेळी हिंद केसरी अमोल बुचडे, कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, ललित लांडगे, दिनेश गुंड (अंतरराष्ट्रीय पंच) दिलीप पवार (अंतरराष्ट्रीय पंच) व निकाळजे ग्रुपचे तानाजी निकाळजे उपस्थित होते. स्पर्धेसाठी बीव्हीजीचे (भारत विकास ग्रुप) सहकार्य असणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल विकास विभागाच्या सभापती सोनाली पोळ व बीव्हीजीच्या वैशाली गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
कुस्ती स्पर्धेचे नियोजन अमोल बुचडे व दिलीप पवार करणार आहेत. कुस्ती स्पर्धेत 1300 कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. वरिष्ठ महिला गट, ग्रीको रोमन व फ्री स्टाईल या प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. या विविध प्रकारात पुढील प्रमाणे वजन गट असणार आहेत. वरिष्ठ महिला गट (50, 53, 55, 57, 59, 62, 65, 68, 72, 76 किलो), ग्रीको रोमन (55, 60, 63, 67, 72, 77, 82, 87, 97 व 130 कि. ग्रॅम) फ्री स्टाईल (57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व 125 कि. ग्रॅम)
स्पर्धेतील विजेते खेळाडू उत्तर प्रदेशात (नंदिनीनगर, गोंडा) 10 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार्या वरिष्ठ गट पुरुष फ्री स्टाईल, ग्रीको रोमण व वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय अंजिक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे.
COMMENTS