Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजारामबापू दूध संघाची विनाकपात 31.30 कोटीची दिवाळी भेट

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी दूध संघांनी दूध उत्पादकांना दूध फरक तसेच कर्मचार्‍यांना बोनस याची एकूण रक्कम 31.25 कोटी होत असून

शेत रस्ते मिळवून देण्याकरीता पुढाकार… भाऊबीजच्या दिवशी चळवळीची सुरुवात
मान्सूनवर ’अल निनो’चे सावट
तब्बल अठरा तासानंतर सांगली बाजार समिती परिसरातील गवा पकडला

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी दूध संघांनी दूध उत्पादकांना दूध फरक तसेच कर्मचार्‍यांना बोनस याची एकूण रक्कम 31.25 कोटी होत असून दूध दर फरक रक्कम दूध संस्था ,सेंटरचे खात्यावर वर्ग केले असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली
दूध संघाचे कर्मचार्‍यांचा बोनस ही खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. संघाची सर्वसामान्य दूध उत्पादकांशी असणारी बांधिलकी तसेच दूध उत्पादकांना दूध व्यवसाय किफायतशीर व्हावा म्हणून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर फरक देण्यात येतो. तसेच या दसरा सणानिमित्त संघाचे सभासदांना मोफत श्रीखंड भेट देण्यात आले. दीपावलीनिमित्त सभासदांना मोफत तूप भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली.
राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाने ना. जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नेत्रदीपक प्रगती केली आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात कमीत कमी खर्चात दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन करणे त्याची गुणवत्ता व चव यामध्ये सातत्य राखणे, दूध उत्पादक व ग्राहक यांना योग्य न्याय देणे, ही काळाची गरज आहे. संघाने या अनुषंगाने सर्व प्रशासकीय खर्च कमी करण्यावर जाणीवपूर्वक भर दिला आहे. दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून संघ दूध उत्पादकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा तथा निविष्ठा सेवा देऊन दूध उत्पादकांचा दूध उत्पादनावर होणारा खर्च कसा कमी होईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच संघ जास्तीत जास्त दूध गुणप्राप्तीवर आधारित दर देत आहे.
दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने सर्व दूध उत्पादक संस्था सभासद यांना रिबेट व कामगारांना बोनस वेळेत मिळावा. यासाठी त्यांचे सुयोग्य नियोजन करुन सर्व रकमा संबंधितांच्या बँक खाते वरती वर्ग होत असल्याने दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी उपाध्यक्ष शशिकांत पाटील, कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी, सहा. व्यवस्थापक पी. डी. साळुंखे उपस्थित होते.

COMMENTS