पुणे जिल्ह्यातील बँकेवर भरदिवसा दरोडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील बँकेवर भरदिवसा दरोडा

पुणे : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर दरोडेखोरांनी भश्रदिवसा दरोडा टाकत 2 कोटी 31 लाख रूपयांची लूट केल्या

छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेसह रिक्षाचालकाचा चोप | LOKNews24
आजचे राशीचक्र शुक्रवार, ०८ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
शिंदे-फडणवीस दररोज १८-१८ तास काम करतात 

पुणे : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर दरोडेखोरांनी भश्रदिवसा दरोडा टाकत 2 कोटी 31 लाख रूपयांची लूट केल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. भरदिवसा चोरांनी दरोडा टाकल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून येथे व्यवस्थापक मोहित चव्हाण रोखपाल सागर पानमंद व इतर दोन कर्मचारी बँकेमध्ये कामकाज करीत होते. त्यावेळी येथे दहा-बारा शेतकरी ग्राहकदेखील उपस्थित होते. अचानक दीड वाजेच्या दरम्यान पांढर्‍या कलरच्या सियाज कारमधून आलेले पाच जण गाडीतुन उतरुन बँकेत शिरले. एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी घेऊन कार गाडीमधून पलायन केले. या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता. पिंपरखेडपासून शिरूर पोलिस स्टेशन सुमारे 45 किमी अंतरावर आहे. घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत घटनास्थळी हजर झाले. पुणे व नगर जिल्ह्यांची नाकाबंदी करण्यांची सुचना देण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS