Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे येथे लष्करी अधिकारी महिलेची आत्महत्या; वरिष्ठा विरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात लष्करातील महिला अधिकार्‍याच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली वर

महाबळेश्‍वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकलसह बाईक रॅली
बसवर ’जय महाराष्ट्र’ लिहून गाडीला फासले काळे; कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्काळ बंद
श्री छत्रपतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट तटस्थ

पुणे : पुण्यात लष्करातील महिला अधिकार्‍याच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याविरुध्द गुन्हा नोंद झाला. मिलिटरी ट्रेनिंग स्कूल अँड डेपोमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या लष्करी अधिकारी महिलेचा मृतदेह बुधवारी सकाळी तिच्या निवासस्थानी आढळून आला होता.
याबाबत मिळालेली माहिती असी की, संबंधित अधिकारी महिलेचा मृतदेह बुधवारी अधिकारी आस्थापना परिसरात असलेल्या निवसास्थानी आढळला होता. प्रथम दर्शनी आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. आता महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS