कृषीकन्या विशाखा उघडे हिने साधला शेतकऱ्यांशी संवाद

Homeताज्या बातम्याअहमदनगर

कृषीकन्या विशाखा उघडे हिने साधला शेतकऱ्यांशी संवाद

कर्जत : प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत कृषी जागरुकता व कार्यानुभव अभ्यास दौरा राब

संगमनेर शहरातील शांतता बिघडवणाऱ्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका – आमदार थोरात
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी ऊस उत्पादन वाढवा : थोरात
सरकार जनतेला सामोरे जाण्यास घाबरतंच का ? I Loknews24 I

कर्जत : प्रतिनिधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत कृषी जागरुकता व कार्यानुभव अभ्यास दौरा राबविण्यात आला. महाविद्यालयातील कृषिकन्या विशाखा विष्णू उघडे हिने कर्जत तालुक्यातील राशीन येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

 यावेळी तिने शेतातील विविध समस्या, पाणी व माती परीक्षण, बीज प्रक्रिया, कृषी मालाची खरेदी विक्री आधारित कृषी ॲपची शेतकऱ्यांना माहिती दिली. विविध ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान सरपंच नीलमताई साळवे, उपसरपंच शंकर देशमुख, सुरेश शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या उपक्रमासाठी विशाखाला प्राचार्य डॉ. एच. जी. मोरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. पेरणे आदींचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS