सर्व सोयींयुक्त उपजिल्हा रुग्णालय घुलेवाडीत लवकरच कार्यान्वित होणार -नामदार थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्व सोयींयुक्त उपजिल्हा रुग्णालय घुलेवाडीत लवकरच कार्यान्वित होणार -नामदार थोरात

संगमनेर प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने व प्रशासनाने अत्यंत चांगले काम केले असून कोरोनाची  आकडेवारी कधीही लपवली नाही. या उ

जामखेडमध्ये विवाहितेवर अत्याचार
खांद्यावर हात ठेवून दोघांनी 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पळवली 
नागपूर-शिर्डी पहिल्या बसचे श्री साई संस्थानने केले स्वागत

संगमनेर प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने व प्रशासनाने अत्यंत चांगले काम केले असून कोरोनाची  आकडेवारी कधीही लपवली नाही. या उलट यांनी आकडेवारी लपवली त्यांच्या रायात गंगेच्या काठी मृतदेह आढळल. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तालुक्यातील नागरिकांकरिता 100 बेडचे विस्तारित कोविड हॉस्पिटल झाले असून आगामी काळात अद्यावत व सर्व सोयींनी युक्त उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी कार्यरत होईल केले जाईल असे प्रतिपादन रायाचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे विस्तारीत कोविड इमारत व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे होत्या तर व्यासपीठावर  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपसंचालक डॉ. गांडाळ, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, प्रांताधिकारी शंशिकात मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, डॉ. राजकुमार ज-हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचोरीया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, गटविकास अधिकारी नागणे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहूल वाघ, उपअभियंता सौरभ पाटील, उपसरपंच चंद्रकांत पानसरे आदिंसह घुलेवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर व नर्स उपस्थित होते.

याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमध्ये आपल्या जवळचे अनेकजण सोडून गेले. कोरोना हा अदृश्य शत्रू आहे तिसर्‍या लाटेचा ही संभाव्य धोका आहे. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. निर्बंध शिथिल झाले म्हणून निष्काळजीपणा करू नका. या संकट काळामध्ये प्रशासनातील सर्व विभाग, आरोग्य कर्मचारी ,नर्स ,डॉक्टर, स्टाफ पोलीस या सर्वांचा अनेकांनी खूप मेहनत केली. हे सर्व ईश्वरी काम होते त्यातूनच अनेकांचे जीव वाचले आहे. दुसर्‍या लाटेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रायभर ऑक्सिजनच्या तुटवडा निर्माण झाला होता. एका रात्री पहाटे तीन वाजता अनेक अडचणीवर मात करून ऑक्सिजनचा टँकर नगरमध्ये वळवला हे सर्वश्रुत आह. त्यातून हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. कोरोना काळात सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहिलो. दररोज वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र नागरिकांनीही आता कोरोनाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नव्याने ऑक्सिजन प्लँटसह 100 बेडचे अद्यावत सेंटर उभे राहिले आहे.  आगामी काळामध्ये उपजिल्हा रुग्णालय होणार असून नागरिकांना आरोग्याच्या अद्यावत सुविधा मिळणार आहे.

नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर शहर व घुलेवाडी परिसराची नागरीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व सुविधांयुक्त ग्रामीण हॉस्पिटल या ठिकाणी उभी राहिले आहे. ऑक्सीजन प्रकल्प, ट्रामा केअर सेंटर, रुग्णवाहिका यांसह आधुनिक उपकरणांचा या ग्रामीण रुग्णालयात वापर होत असून येथील सर्व कर्मचार्‍यांनी आरोग्य सेवा ईश्वर सेवा म्हणून काम केले असल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाची जिल्ह्यात खूप मदत झाली. एक दिवस रात्री संपूर्ण जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा संपला होता अशा वेळी महसूल मंत्री नामदार थोरात यांनी रात्री 3.00 वाजता अनेक अडचणींवर मात करून एक टँकर पाठवला. याचबरोबर जिल्ह्यातील वाढती करुणा रुग्णसंख्या रोखण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले.

कार्यकारी अभियंता आर आर पाटील म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षांमध्ये संगमनेर तालुक्यासाठी 160 कोटी रुपयांचा भरीव निधी मिळाला. असून काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काहींच्या निविदा सुरु झाले आहेत लवकरच ही कामे सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर डॉ. कचोरिया म्हणाले की, तालुकास्तरावरील पहिले आरटीपीसीआर मशीन हे संगमनेरला मिळाले असून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पही सुरु झाला आहे. त्याचबरोबर 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय, 30 बेडचे ट्रामा केअर सेंटर, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, दीडशे कर्मचारी असलेल्या व  सदुसष्ट हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेले रुग्णालये या ठिकाणी कार्यान्वीत झाले आह.

यावेळी दत्तू राऊत, हरीभाऊ ढमाले,भाऊसाहेब सातपुते, चंद्रकांत क्षीरसागर, राजेंद्र आव्हाड,भास्कर पानसरे,श्रीमती डॉ.घोगरे, श्रीमती डॉ.लोहारे, श्रीमती वाडेकर, पोपट आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप कचोरीया यांनी केले. सूत्रसंचालन निलेश परब यांनी केले तर डॉ. राजकुमार जराड यांनी आभार मानले.

COMMENTS