अन्न पदार्थांत भेसळ आढळल्यास ‘FSSAI’ कडे तक्रारी करा ! – मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्न पदार्थांत भेसळ आढळल्यास ‘FSSAI’ कडे तक्रारी करा ! – मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त

प्रतिनिधी : मुंबई अन्नपदार्थांमध्ये भेसळयुक्त पदार्थांचा उपयोग केला असेल, पॅकबंद अन्नपदार्थांवरील ‘पॅक’वर चुकीचे ‘लेबल’ असेल, अन्नपदार्थांविषयी लो

आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्‍वास कोंडला :फडणवीस
Nashik :गिरणा धरणातून दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
देवेंद्र फडणवीसांनंतर आता या भाजप मंत्र्यांनी दिला ‘मी पुन्हा येईन’ चा नारा

प्रतिनिधी : मुंबई

अन्नपदार्थांमध्ये भेसळयुक्त पदार्थांचा उपयोग केला असेल, पॅकबंद अन्नपदार्थांवरील ‘पॅक’वर चुकीचे ‘लेबल’ असेल, अन्नपदार्थांविषयी लोकांची दिशाभूल करणार्‍या चुकीच्या जाहिराती प्रसारीत केल्या असतील, तर अन्न सुरक्षेविषयीच्या विद्यमान कायद्यांनुसार दोषींविरोधात शिक्षेच्या तरतूदी अस्तित्वात आहेत. या संदर्भातील गुन्ह्यांसाठी आर्थिक दंड, कारावास आदी शिक्षा आहेत. अनेकदा दुधामध्ये पाणी, युरिया, स्टार्च, डिटर्जंट आदी पदार्थांची भेसळ केली जाते. ‘भेसळ कशी ओळखावी’ हे ‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण प्राधिकरणा’च्या (FSSAI च्या) संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

दूध किंवा कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये भेसळ लक्षात आल्यास ‘FSSAI’ कडे दूरभाषद्वारे, ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष पत्रव्यवहार यांद्वारे तक्रार करता येते. तक्रार प्राप्त झाल्यावर ‘अन्न सुरक्षा दला’चे अधिकारी तक्रारदाराला कारवाईबाबतची रितसर माहितीही देतात. अन्न पदार्थांत भेसळ आढळल्यास जागरूक नागरिकांनी ‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण प्राधिकरणा’कडे अर्थात ‘FSSAI’ कडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन कोल्हापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. मोहन केंबळकर यांनी केले. ते ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’च्या वतीने आयोजित ‘अन्न भेसळ कशी ओळखावी अन् उपाय ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

       या कार्यक्रमात सातारा आणि कोल्हापूर येथील जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी श्री. सुनील पाखरे यांनी दूध, चहा पावडर, डाळी आदी पदार्थांमधील भेसळ कशी ओळखावी, हे प्रात्यक्षिकांसह दाखवले. हा कार्यक्रम Hindujagruti.org हे संकेतस्थळ, तसेच समितीचे ‘HinduJagruti’ हे ‘यू-ट्यूब’ चॅनल आणि समितीचे ट्वीटर हॅण्डल यांद्वारे प्रसारित करण्यात आला. हा, तसेच २० ऑक्टोबर यादिवशी प्रसारित होणारा या कार्यक्रमाचा पुढील भाग नागरिकांनी अवश्य पहावा आणि ‘भेसळ’ या समस्येविषयी लढा देण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’शी संपर्क साधावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले.

श्री. केंबळकर पुढे म्हणाले की, अनेक ठिकाणी केमिकलचा वापर करुन कृत्रिमरित्या फळे पिकवली जातात. तसेच सरबतामध्ये सुद्धा विविध प्रकारचे रंग वापरुन भेसळ केली जाते. नागरिकांना कुठल्याही प्रकारची भेसळ आढळल्यास त्यांनी याविषयी ‘FSSAI’च्या केंद्रीय विभागाला 18000112100 आणि महाराष्ट्र राज्यासाठी 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. स्वच्छतेचे निकष पाळले जात नसलेल्या ठिकाणांवरील, तसेच उघड्यावरील पदार्थ खाणे नागरिकांनी टाळावे.

COMMENTS