पत्रकार संजय वाघ यांच्या वरील गुन्ह्याचा तपास सी. आय .डी. कडे द्यावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार संजय वाघ यांच्या वरील गुन्ह्याचा तपास सी. आय .डी. कडे द्यावा

नेवासाफाटा(प्रतिनिधी) सोनई  येथील साप्ताहिक चतु: सीमा चें संपादक यांच्यावर शेवंगाव  पोलीस ठाण्यात  भा.द.वी. कलम ३७६ प्रमाणे बलात्का

कामाला लागा : आमदार सुधीर तांबे यांची कार्यकर्त्यांना सूचना
हॉटेल चालकांचा प्रामाणिकपणा, हॉटेलमध्ये विसरलेले ५ तोळे सोन्यासह २० हजाराची रोख रक्कम केली परत
नेवासा तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढणार : ना. शंकरराव गडाख

नेवासाफाटा(प्रतिनिधी)

सोनई  येथील साप्ताहिक चतु: सीमा चें संपादक यांच्यावर शेवंगाव  पोलीस ठाण्यात  भा.द.वी. कलम ३७६ प्रमाणे बलात्काराचा व अन्य स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे  त्या संदर्भात  आज दि. ११ रोजी सोमवारी  नेवासा तहसीलदार  यांना तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की दि. ३०/०९/२०२१ रोजी सोनई येथील साप्ताहिक चतुर सिमा चें संपादक संजय वाघ यांच्यावर शेवंगाव पोलीस ठाण्यात भा.द.वी. कलम ३७६ प्रमाणे बलात्काराचा व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे तरी त्या संदर्भात प्रशासनाने दाखल असेलेल्या गुन्ह्यांची सी आय डी मार्फत  चौकशी करावी व त्यांना न्याय देण्यात यावा तसेच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तरी आपण निःपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी नेवासा तालुक्यातील पत्रकार यांनी केली आहे 

या घटनेचा निषेध म्हणून नेवासा येथील तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्यासह पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी पत्रकारांन वर होणारे हल्ले व खोट्या गुन्ह्या बाबत गुरुप्रसाद देशपांडे, सुधीर चव्हाण, मोहन गायकवाड, रमेश शिंदे बाळासाहेब आरगडे, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या 

यावेळी तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनात प्रेस क्लबचे संस्थापक पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष रमेश शिंदे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन गायकवाड , केंद्रीय पत्रकार संघ राज्य प्रभारी कमलेश गायकवाड, नेवासा फाटा प्रेस क्लबचे संदीप गाडेकर, प्रेस संपादक सेवा संघ गणेश बेल्हेकर, 

मार्गदर्शक अशोक डहाळे, सुधीर चव्हाण , कारभारी गरड, शाम मापारी, सुहास पठाडे,शंकर नाबदे,मकरंद देशपांडे, चंद्रकांत दरंदले, पवन गरुड, अभिषेक गाडेकर रमेश पाडळे, गणेश दारकुंडे,  राम शिंदे, मंगेश निकम,

बाळासाहेब आरगडे, नवनाथ कुसळकर, सौरभ मुनोत,  रमेश राजगिरे, अमित मापारी, रमेश शिंदे, अशोक तुवर,  सतिष उदावंत, अशोक पेहरकर, ऋषभ तलवार, महेश देवढे, बाळासाहेब पंडित,आदेश जावळे,सचिन कुरुंद, अमोल मांडण,  संभाजी शिंदे, राहुल चिंधे, यांच्या सह तालुक्यातील विविध पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

COMMENTS