एलआयसीच्या एमडीआरटी पुरस्काराने कल्पना लवांडे सन्मानित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एलआयसीच्या एमडीआरटी पुरस्काराने कल्पना लवांडे सन्मानित

नगर -  आयुर्विमा महामंडळ, अहमदनगर शाखेतील विमा प्रतिनिधी कल्पना लवांडे यांना एलआयसीमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा एम.डी.आर.टी. हा पुरस्कार वरिष्ठ

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली
शरसंधान ! एसपी साहेब, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात ‘का’? l पहा LokNews24
शनिशिंगणापुरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नगर – 

आयुर्विमा महामंडळ, अहमदनगर शाखेतील विमा प्रतिनिधी कल्पना लवांडे यांना एलआयसीमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा एम.डी.आर.टी. हा पुरस्कार वरिष्ठ शाखाधिकारी निरंजन महाबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उप शाखाधिकारी मकरंद देशपांडे, एलआयसी असोसिएट अशोक गोरे उपस्थित होते.

     सौ.कल्पना लवांडे या गेल्या 22 वर्षांपासून मी एलआयसीचा म्हणून शहर व ग्रामीण भागात प्रसार करत त्यांचा ग्राहकांना लाभ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एलआयसीच्या विविध योजना समोरच्या व्यक्तींना कशा लाभदायी ठरतील हे समजावून  त्यांचे भविष्यातील फायद्याची जाणिव करुन दिली. त्यामुळे अनेकांना त्याचा लाभही झाला आहे, त्यामुळे एक चांगली साखळी यानिमित्त तयार केली. याची दखल घेत  एलआयसीचा महत्वाचा समजला जाणारा एमडीआरटी हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

     याप्रसंगी निरंजन महाबळ म्हणाले, भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एल.आय.सी. ही विमा कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. ती भारतीय समाजाचा एक महत्वाचा भाग आहे. पुरस्कारार्थी कल्पना लवांडे यांनी ग्राहकांना दिलेली सेवा ही उत्कृष्टपणाची असून, त्यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, यापुढेही असेच कार्यरत रहावे, असे सांगितले

COMMENTS