माका : प्रतिनिधी माती परीक्षण, चारा प्रक्रिया, बीजप्रक्रिया, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, गांडूळ खत निर्मिती शेती क्षेत्रात ॲप चा वापर , एकात्मि
माका : प्रतिनिधी
माती परीक्षण, चारा प्रक्रिया, बीजप्रक्रिया, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, गांडूळ खत निर्मिती शेती क्षेत्रात ॲप चा वापर , एकात्मिक तण व्यवस्थापन, फळप्रक्रिया,फळपीकांचे कलम याविषयी माका येथील शेतकऱ्यांना थेट शेतीचा बांधावर मार्गदर्शन करून ऐश्वर्या पुंड हिने प्रात्यक्षिक करून दाखविले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सोनई येथील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या पुंड या कृषी कन्याने कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली.
यावेळी प्रगतशील शेतकरी नारायण केदार, आण्णासाहेब केदार, राऊसाहेब गायके , मल्हारी सांगळे, अशोक जमधडे, नरहरी म्हस्के, आदिनाथ पुंड आदी शेतकरी उपस्थित होते.या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. एच.जी.मोरे , प्रा.एस.एन.दरंदले,प्रा. व्ही.एन.गवांदे,प्रा.व्ही.बी.कडू, प्रा.डी.एन.बनकर,प्रा.आर.जी.
पाटील प्राध्यापिका पी.एस.जाधव,आर.व्ही शेंडगे,एस एफ गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
COMMENTS