दिंडोरी : दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाच विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिंडोरी : दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाच विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया (Video)

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व शिक्षण विभाग पंचायत समिती दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग

अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवा : मंत्री गुलाबराव पाटील
उर्फी जावेदच्या निमित्ताने जातीय ध्रुवीकरण होत असेल तर ते चुकीच – अनुजा सावळे
तुम्ही टीका करत राहा , आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व शिक्षण विभाग पंचायत समिती दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे पाच विद्यार्थ्यांच्या यशस्वी शस्रक्रिया करण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरबीएसके पथकाच्या वतीने शालेय आरोग्य तपासणीत विद्यार्थ्यांची तपासणी करून पाच विद्यार्थ्यांची शस्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली होती. सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉ. बाबूलाल अग्रवाल, भुलरोगतज्ञ डॉ अमृता पोळ, डॉ देवीप्रसाद शिवदे, डॉ. विलास पाटील हे शस्रक्रिया प्रसंगी उपस्थित होते. चार विद्यार्थ्यांच्या टाळूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये जीभ टाळूला चिकटलेली असते. त्यामुळे वाचा दोष निर्माण होतो. बोलण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विपरीत परिणाम होतो. या विद्यार्थ्यांची शस्रक्रिया झाल्याने वाचा दोष दूर होणार असून, या विद्यार्थ्यांना स्पीच थेरेपी दिली जाणार आहे.

COMMENTS