पुणे येथील मासा क्लब संघ प्रथम विजयाचा मानकरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे येथील मासा क्लब संघ प्रथम विजयाचा मानकरी

नेवासाफाटा- प्रतिनिधी नेवासा येथील यशवंत स्पोर्टस् क्लबच्यावतीने आयोजित मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या मैदानात उत्सा

राष्ट्रवादीतर्फे रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन- ढाकणे
कुत्रा हुकला, पण बालकाचा जीव गेला
…तर, महापालिकेतील कोटयावधीचा टेंडर घोटाळा येईल उजेडात

नेवासाफाटा- प्रतिनिधी

नेवासा येथील यशवंत स्पोर्टस् क्लबच्यावतीने आयोजित मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या मैदानात उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत यशवंत स्पोर्ट्स नेवासा , मिलेनियम इंटरनॅशनल स्कूल पुणे , मासा क्लब पुणे व बारामती स्पोर्ट्स क्लब हे चार संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत पुणे येथील मासा क्लब संघ मोठ्या गटात प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरला आहे

तर व्दितीय क्रमांक मिलेनियम इंटरनॅशनल स्कुल पुणे या संघाने पटकवला आहे तृतीय क्रमांक विद्या प्रतिष्ठान बारामती क्लब संघ व चतुर्थ क्रमांक यशवंत स्पोर्ट क्लब नेवासा या संघाने मिळवला आहे तर छोट्या गटात प्रथम क्रमांक-मासा क्लब संघ पुणे ,व्दितीय क्रमांक मिलेनियम इंटरनॅशनल स्कुल पुणे ,तृतीय क्रमांक विद्या प्रतिष्ठान बारामती व चतुर्थ क्रमांक यशवंत स्पोर्ट क्लब नेवासा या संघाने मिळविला

झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ठ खेळाडूचा ‘किताब सृष्टी पंडित या खेळाडूला मिळाला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार,किशोर मिसाळ,वकील संघटनेचे अध्यक्ष नवले ,महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष पार्थ दोषी ,गजानन जिवतोडे,कुलदीप कोंडे ,शिवा जाधव,लक्ष्मण घावटे,के.टी.शिंदे यांच्या उपस्थित पार पडले.

यावेळी बोलताना उपसभापती जोजार म्हणाले कि,विविध प्रकारच्या खेळातून खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते खिलाडू वृत्ती वाढल्याने त्याचा पुढील जीवनात नक्कीच उपयोग होतो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त कलागुण असतात ते कलागुण शिक्षक व पालकांनी वेळेवर ओळखले पाहिजेत.व त्यांचा विकासासाठी संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पापा शेख सर,अयुब शेख,अल्ताफ शेख ,विवेक ननवरे ,जाधव सर ,मंगेश सर ,संभाजी पवार ,संदीप खरात ,राजू लष्करे,अविनाश गाडेकर,रवींद्र ढाकणेजगताप सर यांनी प्रयत्न केले तर पंच म्हणून गौरव दाणे,निखिल हेडे ,संयोग धनवडे,विश्वास गायकवाड,अविनाश शर्मा यांनी पंच म्हणून काम पहिले तर सुत्रसंचालन प्रा.देविदास साळुंके यांनी केले.

COMMENTS