लोणी : प्रतिनिधी महीलांनो घाबरू नका.. आपल्या सोबत जनसेवा फौऊंडेशन आहे. संकटातून मार्ग काढण्याची इच्छा ठेवा आपल्या मदतीसाठी प्रवरा परिवार सदै
लोणी : प्रतिनिधी
महीलांनो घाबरू नका.. आपल्या सोबत जनसेवा फौऊंडेशन आहे. संकटातून मार्ग काढण्याची इच्छा ठेवा आपल्या मदतीसाठी प्रवरा परिवार सदैव तयार असेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी करतांनाच कोविड संकट अजून कमी झाले नाही आपण काळजी घ्यावी असे आवाहन ही केले.
पंचायत समिती राहाता, जनसेवा फौंडेशन, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयोजित महीला स्वयंसहाय्यता गटांना कर्ज आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी प्रवरा अभिमत विद्यापिठाचे मानसपचार तज्ञ डॉ. राहुल शिधये, अँड. स्मिता देशमुख, लोणीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक समाधान पाटील, पंचायत समिती राहाताचे उपसभापती ओमेश जपे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सुनिलकुमार पठारे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अँड रोहीणीताई निघुते, सौ.कविता लहारे, दिनेश बर्डे, पंचायत समिती राहात्याचे माजी सभापती बबलू म्हस्के,पंचायत समिती सदस्य संतोष ब्राम्हणे, काळु रजपुत, संगमनेर पंचायत समितीचे सदस्य निवृत्ती सांगळे, अँड. भास्कर पठारे जिल्हा समन्वय राजेंद्र खांदे, आय सी आय सी आय बँकेचे राहाता समन्वयक सोन कांबळे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, जनसेवा फाऊंडेशनचे सचिव डॉ. अशोक कोल्हे, तालुका कृषि अधिकारी बापूसाहेब शिंदे, माजी प्राचार्या सौ. लिलावती सरोदे, प्रकल्प संचालिका रूपाली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणल्या की, कोंविड काळात जनतेला प्रवरा परीवांराकडून मोठा आधार देण्याचे काम झाले आहे. शिक्षण क्षेत्रात ५० टक्के फि माफी, कोंविड सेंटरची उभारणी मोफत उपचार, कोंविड काळात कोरोना योध्दांचा सन्मान, कोंविडमुळे मयत झालेल्या कुटुंबांच्या मागे प्रवरा परिवार कायम आहे. आपण जे काही समाजासाठी करतो. त्यासाठी पैसा हा विषय कधीहीच नसतो. कोंविडमधील संकटात अनेकांनी आपले जवळीची माणसे गमवली असे सांगत असतांनाच कोविड ग्रस्त कुटूंबाच्या मागे विखे पाटील परिवार सदैव राहील तुम्ही घाबरू नका… सर्वांना बरोबर घेऊन चला ही शिकवण परमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ बाळसाहेब विखे पाटील यांची आहे. हीच परंपरा माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा.डाॅ सुजय विखे पाटील हे पुढे चालवत आहेत. नवरात्र उत्सव येतोय लस घ्या परिवारांची काळजी घ्या असे सांगतानाच महीलांनो आपल्यातील शक्ती ओळखा. काम करत रहा फळ आपोआप मिळेल असे असेही सांगितले.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकांत समर्थ शेवाळे यांनी जनसेवा फौडेशन मार्फत सुरू असलेल्या बचत गटांचा आढावा घेतला. यावेळी तांत्रिक सञात डॉ. राहुल शिधये यांनी मानसउपचार, महीलांच्या विविध समस्या, चिंतामुक्ती यांवर मार्गदर्शन केले.पोलिस निरिक्षक समाधान पाटील यांनी पोलिस यंञणा सदैव आपल्या सोबत आहे. अन्याय सहन न करता त्यावर उपाय करा जनसेवा फौडेशनचे कौंटुबिक सल्ला केंद्राचे काम महीलासाठी दिशादर्शक आहे असे सांगितले. यावेळी अॅड.स्मिता देशमुख आणि डाॅ अशोक कोल्हे यांनी महीलांचे हक्क अधिकार यांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते महीला गटांसाठी १ कोटी ४० लाख रुपये कर्ज वितरण, ४ लाख २० हजार खेळते भांडवळ यांचे धनादेश आणि मंजूरी पत्र, माझी कन्या भाग्यश्री योजना पावती, दुर्गापूर येथील ब्युटी पार्लर, आधुनिक शिवणकाम प्रमाणपत्र, परसबाग बियांणे, आत्मा अंतर्गत कोविड बाधित कुंटुंबास बियाणे वाटप, कुपोषित बालकांना पोषण किटचे वितरण, कोरोना योध्दाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बचत गरांचे समन्वय प्रमोद पांडे यांनी केले.
COMMENTS