महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

संगमनेर/प्रतिनिधी महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत ७/१२ वाटप आज द

कोरोना उपाययोजनांना पहिले प्राधान्य : नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतला पदभार
स्पर्धेत भाग घेतल्यानेच विद्यार्थ्यांची होईल प्रगती : देवदान कळकुंबे
रोटरी क्लब शेवगाव आयोजित सूर नवा ध्यास नवा दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न

संगमनेर/प्रतिनिधी

महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत ७/१२ वाटप आज दि. २ रोजी महात्मा गांधी जयंती पासून सुरू करण्यात येत आहे.

या अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील प्रत्येक सजेच्या किमान एका गावात आज या योजनेचा शुभारंभ करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून आज स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांचे वारस, दीव्यांग खातेदार, वयोवृद्ध खातेदार यांना त्यांच्या घरी जाऊन तलाठी यांचे मार्फत ७/१२ देण्यात येत आहेत. 

याशिवाय, गावातील माजी सैनिक अथवा कार्यरत सैनिक यांचे कुटुंबीय, १९४७ सालात जन्म झाला आहे असे खातेदार, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे असे शेतकरी, २ ऑक्टोबर जन्मतारीख असलेले खातेदार, गावातील वरिष्ठ महिला खातेदार यांना आज मोफत ७/१२ वितरित करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

तालुक्याचा मुख्य कार्यक्रम राजापूर येथे माननीय आमदार डॉ सुधीरजी तांबे साहेब यांचे अध्यक्षतेखाली व माननीय उपविभागीय अधिकारी डॉ शशिकांत मंगरूळे साहेब यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी रामहरी कातोरे, जिल्हा परिषद सदस्य, विष्णु पंत रहाटल, पंचायत समिती सदस्य, संतोष हासे, तहसीलदार अमोल निकम, नायब तहसिलदार उमाकांत कडनोर उपस्थित होते.

COMMENTS