स्व. विठ्ठलराव भैलुमे यांना कर्जतमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन

Homeताज्या बातम्याशहरं

स्व. विठ्ठलराव भैलुमे यांना कर्जतमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन

कर्जत प्रतिनिधी कर्जत- जामखेडचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव भैलुमे यांना कर्जतमध्ये ८६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री प्र

महर्षी शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
श्रीगोंदे बाजाराची दयनीय अवस्था
2018 मध्ये टीईटीच्या 600-700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क | DAINIK LOKMNTHAN

कर्जत प्रतिनिधी

कर्जत- जामखेडचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव भैलुमे यांना कर्जतमध्ये ८६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री प्रा. राम शिंदे, अशोक खेडकर, अनिल गदादे, प्रकाश शिंदे, विनोद दळवी, सुनिल यादव, काका ढेरे, प्रवीण फलके, गणेश पालवे यांच्यासह भैलुमे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

कर्जतच्या प्रथम महिला नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांचे ते सासरे होत. कर्जत येथील त्यांच्या निवासस्थानी प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील कमल भैलुमे, राजेंद्र भैलुमे, प्रताप भैलुमे, नंदकिशोर भैलुमे, निशिकांत भैलुमे, प्रवीण भैलुमे, प्रणव भैलुमे, अजित भैलुमे, सागर भैलुमे, अजय भैलुमे आदी सदस्य उपस्थित होते.

विठ्ठलराव भैलुमे यांचा जन्म १ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला. १९७० साली त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश करून मागासवर्गीय फार्मिंग सोसायटीचे अध्यक्षपद भुषविले. १९९० मध्ये त्यांना काँग्रेसकडून कर्जत- जामखेडची उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते.

आमदारकीच्या काळात त्यांनी कर्जत शहराला खेडमधून पाणी पुरवठा योजना आणली. जामखेड शहरासाठी भुतवडा पाणी पुरवठा योजना दिली. कर्जल व जामखेडमध्ये २४ बंधारे त्यांच्याच काळात झाले. हमाल पंचायतची स्थापना, वीज उपकेंद्राची मंजुरी, दूरसंचार विभाग कार्यालय अशी अनेक कामे भैलुमे यांच्या कार्यकाळात झाली.

COMMENTS