संगमनेर औद्योगिक वसाहतीत सततच्या चोरीची घटना

Homeताज्या बातम्याशहरं

संगमनेर औद्योगिक वसाहतीत सततच्या चोरीची घटना

संगमनेर : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये चोरीच्या घटनांनी जोर पकडला आहे. नुकतीच दि.३० सप्टेंबर रोजी विजया अ

Sangamner : कोविडचे नियमच तहसीलदार अमोल निकम यांनी बसवले धाब्यावर (Video)
ना. थोरात यांच्या पाठपुराव्यातुन तालुक्यात 5 मेगाहोल्ट पावर ट्रांसफार्मर मंजूर
Sangamner : संगमनेर शहरामध्ये ६० टक्के लसीकरण पूर्ण (Video)

संगमनेर : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये चोरीच्या घटनांनी जोर पकडला आहे. नुकतीच दि.३० सप्टेंबर रोजी विजया अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये ऑफीसचे लॉक तोडून ड्रॉवरमधून रुपये दहा हजार रोख तसेच त्याच ड्रॉवरमध्ये ठेवलेले कंपनीच्या कामाचे चार मोबाईल चोरीला गेले आहेत. हे सर्व चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून एका उद्योजकाने त्याआधीच काही वेळापूर्वी संशय आल्यामुळे या लोकांच्या गाडीचा फोटोसुद्धा काढला होता. 

बऱ्याच वेळा छोट्या चोऱ्यांची वाच्यता होत नाही त्यामुळे या गोष्टी समोर येत नाहीत परंतू संगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या एका महिन्यांच्या कालावधीमध्ये ८ ते १० छोट्यामोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. विजय अॅग्रोचे संचालक विवेक रोहकले यांनी यासंबंधी माहिती देण्याचे आवाहन केल्यानंतर बऱ्याचश्या उद्योजकांनी आमच्या येथेही चोरीच्या घटना झाल्याचे नमूद केले आहे. याआधीही चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. श्रद्धा प्लास्ट या कंपनीचे ऑफीस फोटून रोख रक्कम व मोबाईल चोरीला गेले होते तर एमआयडीसीचे मिटींग हॉल, उद्योजकांचे तीन गाळे व मेन गेटचे कुलूप एकाच वेळी तोडले होते. एका फर्टीलायझर कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या तीन मालवाहू गाड्यांच्या बॅटरी काढून घेतल्या. तसेच एका शेतमालाचे औजारे बनविणाऱ्या कंपनीचे सामान चोरांनी चोरले. या सर्व उद्योजकांनी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दिलेली आहे, परंतू याबाबत कुठलीही प्रगती झालेली नाही अशी माहिती संस्थेचे प्रभारी व्यवस्थापक गणेश कासार यांनी दिली आहे.

त्यामुळे एमआयडीसीमध्ये एक पोलिस चौकी असावी अशी मागणी उद्योजक सातत्याने करीत आहेत, त्यासाठी जागा द्यायलाही उद्योजक तयार आहेत परंतू प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या चोऱ्या वाढल्या आहेत. उत्पादित केलेला माल चोरीला गेल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान वेगळे परंतू त्याबरोबर कंपनीतील मोबाईल आणि इतर गोष्टी चोरीला गेल्यामुळे व्यावसायिकाचे इतर नुकसानही खूप होत आहे. यामुळे आता संगमनेर औद्योगिक वसाहतीत एक कायमस्वरुपी पोलिस चौकी उभारावी व झालेल्या चोऱ्यांचा योग्य तपास करावा अशी मागणी सर्व उद्योजकांकडून होत आहे. 

COMMENTS